मेट्रो स्थानकांपासून थेट घरापर्यंत ९ रुपयात करता येणार वातानुकूलित प्रवास, जाणून घ्या... केव्हा कुठे मिळणार ही सेवा?

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्टेशनबाहेर पडताच सुरू होणारा ऑटो, टॅक्सी मिळवण्यासाठी होणारा संघर्ष बसची गर्दी आता इतिहासजमा होणार आहे. रिक्षा, कॅबच्या भाड्याचा ताण आणि बससाठीची गर्दी टाळत आता अवघ्या ९  रुपयांत वातानुकूलित बसमधून घर किंवा कार्यालयापर्यंत पोहोचता येणार आहे. मेट्रो लाईन-३  वर प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक व्यवस्था ठरणार आहे.


कुलाबा–वांद्रे–सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गावर प्रवाशांचा ओघ झपाट्याने वाढत आहे. मेट्रोला मिळणारा हा वाढता प्रतिसाद पाहता, प्रवाशांचा शेवटचा टप्पा अधिक सोपा करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने सिटीफ्लोच्या सहकार्याने थेट बससेवेचा निर्णय घेतला आहे. मेट्रो स्थानकांपासून जवळच्या निवासी आणि व्यावसायिक भागांपर्यंत ही सेवा थेट कनेक्टिव्हिटी देणार आहे.


अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर केवळ काही महिन्यांतच मेट्रो-३  वरील प्रवासीसंख्या दुपटीने वाढली आहे. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत दैनंदिन प्रवासीसंख्या आता दीड लाखांच्या घरात पोहोचली असून, काही दिवसांत तर विक्रमी गर्दीही पाहायला मिळाली आहे. या वाढत्या प्रवाहामुळे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ ही मेट्रोसमोरील सर्वात मोठी गरज ठरली होती.


बीकेसी, वरळी, आरे, जेव्हीएलआर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही पाच महत्त्वाची स्थानकं या नव्या बससेवेत महत्वाची असणार आहेत. कार्यालयीन वेळेत या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी एसी बस उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे.


कमी खर्च, अधिक आराम आणि वेळेची बचत, या तिन्ही गोष्टी एकाच प्रवासात मिळाल्याने मुंबईकरांच्या दैनंदिन धावपळीत मोठा बदल घडणार आहे. मेट्रोचा प्रवास जितका सोपा, तितकाच स्टेशनबाहेरचाही प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा