मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील चार नगरसेवकांचा समावेश आहे. मुस्लीम नगरसेवकांची ही वाढती संख्या त्यातही मुस्लीम महिलांची जास्त संख्या लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील मुस्लिमबहुल पट्ट्यांमध्येही एआयएमआयएमकडे वळलेली मते आता निर्णायक ठरत आहेत.
मागील कार्यकाळात २७ नगरसेवकांची संख्या आता थेट ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता मुस्लिम मतदारांना कोणी यापुढे गृहीत धरू नये असा इशाराच यातून मिळत आहे. मुंबई शहरातील मुस्लिम बहुल विभागात जी मते पूर्वी काँग्रेस व नंतर समाजवादी पार्टीला पडत होती. आता तीच मते हैदराबाद पुरती मर्यादित असलेल्या एआयएमआयएमला पडताना दिसत आहे तर मुंबईतील बहुतांश भागात मुस्लिम मते ही भाजपला विरोध म्हणून मुस्लिम मतदारास मिळतात. हे लक्षात घेता यंदा सर्वच पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना तिकीट मोठ्या प्रमाणात दिले होते त्यात शिवसेना उबाठाचे नऊ उमेदवारांपैकी तीन निवडून आले तर समाजवादी पार्टी व काँग्रेसनेही मुस्लिम मतदार उभे करून नगरसेवक निवडून आणले. मागील कार्यकाळात २७ नगरसेवक होते ती संख्या आता ३१ झाली आहे. विशेष म्हणजे भाजपने एकही मुस्लिम उमेदवार यावेळेस दिला नव्हता.






