Sunday, January 18, 2026

जागतिक बेरोजगारी यंदा ४.९% वर स्थिर राहण्याचा अंदाज

जागतिक बेरोजगारी यंदा ४.९% वर स्थिर राहण्याचा अंदाज
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ताज्या अहवालानुसार, २०२६मध्ये जागतिक बेरोजगारी दर अंदाजे ४.९% राहण्याची अपेक्षा आहे, म्हणजे सुमारे १८.६ कोटी लोक बेरोजगार असतील. मागील २० वर्षांत रोजगाराची गुणवत्ता हळूहळू वाढली असून, अत्यंत गरीबीत राहणाऱ्या कामगारांची टक्केवारी २०१५ ते २०२५ दरम्यान फक्त ३.१ टक्क्यांनी कमी झाली आहे. आज सुमारे २८.४ कोटी कामगार दररोज ३ डॉलर्सपेक्षा कमी कमावत आहेत. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कामगारांचे खूप आणि मध्यम गरीबीत राहण्याचे प्रमाण वाढले आहे, तर २०२६ पर्यंत २.१ अब्ज लोक अनौपचारिक क्षेत्रात काम करत असल्याचे अंदाज आहे, ज्यांना जॉब सिक्युरिटी, सोशल प्रोटेक्शन आणि कामाचे अधिकार कमी मिळतात. जागतिक रोजगार वाढीचा दर १% राहण्याची अपेक्षा आहे, तर युवांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे.२७.९% तरुण न शिकत आहेत, न काम करत आहेत, न प्रशिक्षण घेत आहेत. एआय आणि ऑटोमेशनमुळे उच्च कौशल्य असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळवणे कठीण होऊ शकते. महिला कामगारांसाठीही परिस्थिती सुधारलेली नाही; पुरुषांपेक्षा महिलांना लेबर फोर्समध्ये सहभागी होण्याचे संधी सुमारे २४% कमी आहेत. जागतिक व्यापारातही अस्थिरता दिसून आली असून, ट्रेड-लिंक्ड रोजगार जगभरातील रोजगाराचा सुमारे १५.३ % आहे. एशिया-पॅसिफिकमध्ये २०२५ मध्ये बेरोजगारी ४.१% होती, तर चीनच्या शहरी तरुणांमध्ये बेरोजगारी १७.८% वर पोहोचली. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (आयएलओ) डायरेक्टर-जनरल गिल्बर्ट हौंगबो यांनी सरकार, नियोक्ता आणि कामगारांना एकत्र काम करून टेक्नॉलॉजीचा जबाबदारीने वापर करण्याची आणि महिलांसाठी व युवांसाठी चांगल्या नोकऱ्यांचे संधी वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले.
Comments
Add Comment