‘क्रिप्टो’च्या नावाने ९० लाख लुटले!

एमआयडीसी पोलिसांकडून तीन आरोपींना अटक


मुंबई : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका कापड व्यावसायिकाची सुमारे ९० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ॲन्थोनी चेट्टीयार ऊर्फ ॲन्थोनी साहिल, सोहेल खान आणि अमजदअली शेख अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार कापड व्यावसायिक असून ते विलेपार्ले येथे राहतात. त्यांची घाटकोपर येथे एका खासगी कंपनी असून या कंपनीतून त्यांचे सर्व व्यवहार चालतात. गेल्या वर्षीं त्यांची ध्रुव मेहता या व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्याचा गारमेंटसह फॅब्ररिक अक्सेसरीजचा व्यवसाय आहे. त्यांचा सर्व व्यवहार क्रिप्टो करन्सीमध्ये चालत असून त्यात त्यांना रुपयांच्या तुलनेत जास्त फायदा होत असल्याचे सांगितले.


त्यामुळे त्यांनीही त्यांचे सर्व व्यवहार क्रिप्टो करन्सीमध्ये करण्याचा सल्ला दिला. त्याच्या परिचित काही डिलर कडून ते त्यांना क्रिप्टो करन्सी देतील असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडून क्रिप्टो करन्सी घेण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे ते त्यांच्या भावासोबत ध्रुवच्या अंधेरीतील कार्यालयात गेले. तिथे ध्रुवसोबत इतर सातजण उपस्थित होते.


यावेळी ध्रुवने त्यांची ओळख ॲन्थोनी साहिल, अमजद शेख, अजगर हुसैन, शेख अशफाक, मनोज प्रजापती आणि मोहम्मद तौसिन खान अशी करून दिली. ही रक्कम ॲन्थोनीला देण्यास सांगून त्याने त्यांना दिलेल्या क्यूआर लिंकवर क्रिस्टो करन्सी ट्रान्स्फर करणार असल्याचे सांगतले. त्यामुळे त्यांनी ॲन्थोनीला ९० लाख रुपये दिले. मात्र बराच वेळ होऊन त्यांनी त्यांना एक लाख युएसडीटी क्रिप्टो करन्सी पाठविली नाही.


त्यामुळे त्यांनी ध्रुवसह इतर सातही आरोपींना संपर्क साधून याबाबत विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आठजणांविरुद्ध एमआडीसी पोलिसांत तक्रार केली. याच गुन्ह्यात एक महिन्यांपासून फरार असलेल्या ॲन्थोनी, सोहेल आणि अमजदअली यांना पोलिसांनी अटक केली.

Comments
Add Comment

मुरबाडच्या सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत विशेष निमंत्रण

लोकसहभागातील विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल मुरबाड : मुरबाड तालुक्यातील

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत भाजपचा शिवसेनेला धक्का!

सत्ता गेली; शिवसेनेचे मोठे नेते प्रवीण राऊत यांचे भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत बदलापूर : मुंबई महापालिकेसह

उल्हासनगर महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्तेसाठी 'सेटिंग'

वंचितचे नगरसेवक सुरक्षित स्थळी हलवले उल्हासनगर : महानगरपालिका निवडणुकीनंतर उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी खऱ्या

भारताच्या मदतीने श्रीलंकेत तिसरा बेली ब्रिज पूर्ण

कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा

भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद