मोहित सोमण: प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो (Wipro Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) इयर ऑन इयर बेसिसवर ७% घसरण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ३३५३ कोटीवरून यंदा डिसेंबरमध्ये ३११९ कोटींवर घसरण झाली आहे. तर कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत २२३१ कोटीवरून २३५५ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर ४४५३ कोटीवरून ४१३३ कोटींवर घसरण झाली आहे. ईपीएस (Earning per share EPS) इयर ऑन इयर बेसिसवर ३.२१ वरून २.९७ रूपयांवर घसरण झाली आहे.
यासह उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५.५% वाढ झाली असून तिसऱ्या तिमाहीत (Q3FY25) मधील २२३१८.८ कोटींवरून महसूल २३५५५.८ कोटीवर पोहोचला. तिमाही बेसिसवर (QoQ) महसूल २२६९७.३ कोटींवरून ३.८% वाढला असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. निकाल जाहीर करताना संचालक मंडळाने विप्रोच्या संचालक मंडळाने प्रति शेअर ६ च्या अंतरिम लाभांशालाही मंजुरी दिली असून ज्यासाठी २७ जानेवारी ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे.
तिमाही निकालावर प्रतिक्रिया देताना,'कर्मचारी लाभ खर्चामध्ये ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तीन आणि नऊ महिन्यांच्या कालावधीत नवीन कामगार संहिता लागू केल्यामुळे ग्रॅच्युइटीवरील भूतकाळातील सेवा खर्चाचा ३०२.८ कोटींचा परिणाम समाविष्ट आहे' असे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
कंपनीच्या मते, नवीन कामगार संहिता लागू केल्यामुळे आयटी क्षेत्रातील नफ्याच्या फरकावर परिणाम झाला आहे. उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस आणि एचसीएलटेक यांनी त्यांच्या तिसऱ्या तिमाहीत (Q3) च्या निकालांमध्ये महत्त्वपूर्ण परिणामाची नोंद केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, टीसीएसने सांगितले होते की या बदलांमुळे तिसऱ्या तिमाहीत (Q3 FY26) मध्ये २१२८ कोटींचा वैधानिक शुल्क आकारले गेले. शुक्रवारी कंपनीचा शेअर २.५४% उसळत २६६.८० रूपयांवर बंद झाला असून गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये २.१४% वाढ झाली आहे तर महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये २.१७% वाढ झाली आहे. तर वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ५.३७% घसरण झाली आहे तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ०.२१% घसरण झाली आहे.






