मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विजय झाला असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मुंबईत आपले खाते उघडले आहे. त्यामुळे मुंबईत अजित पवारांचे दोन ते शरद पवार गटाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई ९२ जागा लढवल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (शरद पवार) ११ उमेदवार निवडणूूक रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी सकाळीच आपले खाते उघडले. परंतु, सकाळ आणि दुपारपर्यंत या पक्षाचा एकही उमेदवार निवडून न आल्याने त्यांना आपला भोपळाही फोडता आलेला नाही अशा प्रकारच्या चर्चा होत्या; परंतु संध्याकाळी या पक्षाचा पहिला नगरसेवक निवडून आला. भाजपचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांचा पराभव केला. मालाड पूर्वमधील प्रभाग क्रमांक ४३मधून भाजपचे विनोद मिश्रा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार अजित रावराणे यांनी पराभव केला. या पक्षा हे एकमेव नगरसेवक असून यापूर्वी अजित रावराणे आणि त्यांच्या पत्नी रूपाली रावराणे या नगरसेवक म्हणून निवडून आले होत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ. सईदा खान आणि बुशरा मलिक हे उमेदवार निडून आले आहे.