Saturday, January 17, 2026

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू
चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून वैष्णवी पाटील यांच्यासह अन्य तिघे जखमी झाले आहेत. पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी पाटील या बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परतत असताना आज पहाटे त्यांची इनोव्हा कार एका लॉरीला धडकली. धडक इतकी तीव्र होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वाहनांच्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरोमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही घटनेची अधिक चौकशी केली जात आहे.
Comments
Add Comment