Saturday, January 17, 2026

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले

पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांच्या निवडणुकीत भाजपने ७४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. या निकालामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, त्यांना केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेला १० जागा प्राप्त झाल्या आहेत. तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. या परिणामाने भाजपला महापालिकेत पूर्ण नियंत्रण मिळाले असून, विरोधी पक्षांना मोठी हार पत्करावी लागली आहे. शिवसेना (दोन्ही गट), मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे उमेदवार अद्याप एकही जागा आघाडीवर नाहीत. हडपसर भागातील प्रभाग क्रमांक १६ मधून उबाठाचे उमेदवार नितीन गावडे यांनी विजय मिळवला आहे. ते पुण्यातील उबाठाचे पहिले अधिकृत उमेदवार असून कार्यकर्त्यांमध्ये काहीसे हायसे वातावरण आहे. शहरात केवळ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच सत्तेची खरी लढत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे व उबाठा गट) – मुंबई आणि ठाण्यात मुसंडी मारणाऱ्या दोन्ही गटांना पुण्यात अद्याप खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे पुण्यात शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

राज ठाकरेची मनसे – राज ठाकरेंनी पुण्यात अनेक सभा घेतल्या, ‘दुबार मतदार’ आणि ‘शाई’चा मुद्दा पुढे आणला, तरी मतदारांनी मनसेच्या उमेदवारांना सध्या नाकारल्याचे कल दिसत आहेत. वसंत मोरे यांसारखे दिग्गज उमेदवारही पिछाडीवर आहेत.

वंचित बहुजन आघाडी व एमआयएम– पुण्याच्या झोपडपट्टी आणि दलित-मुस्लिम बहुल वॉर्डांमध्ये प्रभाव पाडणाऱ्या या पक्षांना अद्याप आघाडी मिळवता आलेली नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी गटाची पकड १४ पेक्षा जास्त जागांवर आहे. काँग्रेसला प्रशांत जगताप यांच्या विजयाने काही प्रभागांत खाते उघडता आले असले तरी, इतर छोट्या पक्षांचा सुपडा साफ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment