Kangana Ranaut : "ज्यांनी माझं घर तोडल आज त्यांच..."ठाकरेंच्या पालिका निवडणुकीतील पराभवावर कंगना रनौतची सडकून टीका

कंगना रनौत : महाराष्ट्रातील महानगर पालीक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) मोठे यश मिळवत देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (बीएमसी) आपली सत्ता मिळवली आहे. तब्बल २८ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाचे बीएमसीवरील वर्चस्व नष्ट झाले असून, या निकालावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.


कंगना रनौत यांनी बीएमसी निवडणुकीतील भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना पक्षाच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने आपण अत्यंत आनंदी असल्याचे कंगनाने सांगितले. यावेळी कंगना रनौत यांनी २०२० मध्ये मुंबईतील त्यांच्या घरावर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत ठाकरे कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका केली. “ज्यांनी मला गाल्या दिल्या, माझं घर पाडलं, मला महाराष्ट्र सोडण्याच्या धमक्या दिल्या, आज त्यांचाच महाराष्ट्राने साथ सोडली आहे,” असे कंगना म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिला विरोधी मानसिकता, धमकावण्याची संस्कृती आणि घराणेशाहीचा माज असलेल्या लोकांना जनतेने योग्य जागा दाखवली आहे.


उल्लेखनीय म्हणजे, २०२० साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बीएमसीने कंगना रनौत यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर कारवाई केली होती. या प्रकरणी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बीएमसीची कारवाई “दुर्भावनापूर्ण” असल्याचे नमूद करत कंगनाच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

मनपा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

जे साथ देतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकारणात कोणीही शत्रू नाही

मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या

मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर भाजपने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले

राणेंचे घर तोडण्यापासून सुरुवात झाली, आता मातोश्री-२ ची वेळ!

मंत्री नितेश राणेंचा इशारा; ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत मुंबईत आमचा महापौर विराजमान होणार मुंबई : “उद्धव ठाकरेंनी

महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू