Saturday, January 17, 2026

मीरा-भाईंदरच्या माजी महापौर किमया रकवी पराभूत

मीरा-भाईंदरच्या माजी महापौर किमया रकवी पराभूत
भाईंदर : मीरा-भाईंदरच्या माजी महापौर कॅटलिन परेरा भाजपच्या किमया रकवी यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. शिवसेनेच्या माजी महापौर कॅटलिन परेरा या भाईंदर पश्चिम भागातील प्रभाग क्र. ८ मधून आपल्या पारंपरिक प्रभागातून निवडणूक लढवत होत्या. कॅटलिन परेरा यांना राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचे वडील गिल्बर्ट मेंडोसा हे सरपंच ते नगराध्यक्ष होते. त्यानंतर प्रथम आमदार होते. तर त्यांची आई मायरा मेंडोसा या मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रथम महापौर होत्या. राजकीय वारसा चालवत कॅटलिन परेरा महापौर झाल्या होत्या. पण या निवडणुकीत मात्र त्यांना भाजपच्या अवघ्या २२ वर्षीय किमया सुहास रकवी या अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या युवतीने पराभवाची धूळ चारत विजय मिळवला आणि जॉईंट किलर ठरली आहे. माजी महापौर कॅटलिन परेरा यांना ६९५० मते मिळाली तर किमया रकवी हिला ८५८६ मते मिळाली आहेत.
Comments
Add Comment