मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार महापौर आणि तीन उपमहापौर निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये उबाठाचे चार महापौर आणि दोन उपमहापौर तसेच भाजपचा एक उपमहापाैर यांचा समावेश आहे. यातील सर्व महापौर आणि उपमहापौर यांनी विजय मिळवत आले गड राखले आहेत. यातील किशोरी पेडणेकर आणि श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीवरून उबाठा पक्षात प्रचंड नाराजी होती; परंतु त्यानंतर दोन्ही उमेदवारांनी आपला विजय मिळवला. मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक जागी धक्कादायक निकाल लागले. भाजप-शिवसेना एकीकडे मुसंडी मारत असताना उबाठा गट व मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
विजयी झालेले माजी महापौर-उपमहापौर
- विजयी : किशोरी पेडणेकर (माजी महापौर) - (उबाठा) प्रभाग १९९ (सात रास्ता- धोबीघाट)
पेडणेकर यांनी शिवसेनेच्या रूपल राजेश कुसळे यांचा पराभव केला. - विजयी : विशाखा राऊत (माजी महापौर) - (उबाठा) प्रभाग १९१ (माहीम-शिवाजी पार्क)
राऊत यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला. - विजयी : श्रद्धा जाधव (माजी महापौर) : (उबाठा) प्रभाग २०२ (शिवडी)
जाधव यांनी भाजपचे पार्थ बावकर यांचा पराभव केला. - विजयी : मिलिंद वैद्य (माजी महापौर) (उबाठा) प्रभाग १८२(माहीम कोळीवाडा, पोलीस कॉलनी )
वैद्य यांनी भाजपचे राजन पारकर यांचा पराभव केला. - विजयी : हेमांगी वरळीकर (माजी उपमहापौर)-(उबाठा) प्रभाग १९३ (वरळी कोळीवाडा)
वरळीकर यांनी शिवसेनेचे प्रल्हाद वरळीकर यांचा पराभव केला. - विजयी : सुहास वाडकर, माजी उपमहापौर (उबाठा) प्रभाग ४१ मालाड पूर्व
वाडकर यांनी शिवसेनेच्या मानसी पावसकर यांचा पराभव केला. - विजयी : अलका केरकर माजी उपमहापौर (भाजप) प्रभाग ९८ वांद्रे पश्चिम
केरकर यांनी मनसेच्या दीप्ती काते यांचा पराभव केला.