Friday, January 16, 2026

इन्फोसिस शेअरमध्ये सकाळी ६% तुफान वाढ 'या' कारणामुळे

इन्फोसिस शेअरमध्ये सकाळी ६% तुफान वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये ६% पातळीवर तुफान वाढ झाली आहे. इन्फोसिस कंपनीच्या तिमाही निकालानंतर ही वाढ झाली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात घसरण झाली असतानाही गुंतवणूकदारांनी मजबूत फंडामेंटलमधील आधारावर व ब्रोकरेजने अपसाईड वाढीचे संकेत दिल्याने अखेर शेअरमध्ये आज वाढ झाली. सकाळच्या सत्रातील सुरूवातीच्या कलातच शेअर ५.५०% उसळला होता. दुपारी १२.०९ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ५.७६% उसळत १६९१.९० रूपयावर व्यवहार करत आहे. आगामी स्थितीत कंपनीच्या महसूलात मोठी सुधारणा झाली असताना दुसरीकडे आगामी काळातही कंपनीच्या महसूलात सुधारणा होणे अपेक्षित आहे. विशेषतः महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर तिसऱ्या तिमाहीत ३.५% वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी आज शेअरला सकारात्मक कौल दिला आहे.

मोतीलाल ओसवालकडून कंपनीच्या शेअरला सकारात्मकता व्यक्त केली गेली आहे. ब्रोकरेज मते, कंपनीच्या वित्तीय सेवा आणि ऊर्जा संबंधित व्यवसायात ऐच्छिक खर्चातील पुनर्प्राप्तीमुळे आर्थिक वर्ष २०२७ मध्ये कंपनीच्या महसूलात वाढ अपेक्षित आहे. मोतीलाल ओसवाल यांनी असेही नमूद केले की, युनायटेड किंगडममधील एका मोठ्या राष्ट्रीय आरोग्य सेवा कराराच्या वाढीव अंमलबजावणीमुळे आरोग्यसेवा क्षेत्राच्या महसुलाला फायदा झाला.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात सकारात्मकता शेअरबद्दल निर्देशित केली होती. इन्फोसिसला २२०० रुपयांची लक्ष्य किंमत (Target Price TP) दिली असून शेअरला ३८% अपसाईड वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेजच्या अहवालानुसार आगामी महसूलातील सुधारणेनंतर २०२६ च्या मध्यापासून कृत्रिम बुद्धिमत्ता सेवांवरील खर्च लक्षणीयरीत्या वाढू शकतो.

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने मजबूत डील गतीवरही प्रकाश टाकला. या तिमाहीत मोठ्या करारांचे एकूण मूल्य सुमारे ४.८-४.९ अब्ज डॉलर्स होते ज्यापैकी सुमारे ५७% करार नवीन ग्राहकांकडून मिळाले. कंपनीकडून तिमाही निकालाबाबत मत व्यक्त करताना हे करार आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भागीदारीमुळे आगामी वर्षांमध्ये बँकिंग आणि वित्तीय सेवा, तसेच ऊर्जा, उपयुक्तता, संसाधने आणि सेवांसारख्या क्षेत्रांमध्ये वाढीला चालना मिळू शकेल असे म्हटले होते. सकाळी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असताना गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ५.८६% वाढ झाली आहे तर गेल्या महिनाभरात शेअर्समध्ये ६.१६% वाढ झाली आहे. तर कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात १२.३१% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) बेसिसवर ३.७६% वाढ झाली होती.

Comments
Add Comment