मुंबईत महायुतीची मुसंडी पाहताच भाजपचा प्रहार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत महायुतीने (भाजप-शिंदे गट) निर्णायक आघाडी घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या विजयाचा आनंद साजरा करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची थेट खिल्ली उडवली आहे. नितेश राणे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ते ठाकरे गटाच्या पराभवावर हसताना दिसत आहेत.
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे, ...
काय आहे 'त्या' व्हिडीओमध्ये?
View this post on Instagram
नितेश राणे यांनी शेअर केलेल्या २२ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ते अत्यंत आनंदात दिसत असून ठाकरे गटाच्या स्थितीवर हसत आहेत. "उद्धवजी आणि पेग्विनला जय श्रीराम" असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या ठाकरेंच्या सत्तेला यंदा सुरुंग लागल्याचे पाहून राणे यांनी हा 'विक्टरी' मोडमधील व्हिडीओ शेअर केला आहे.
"रडणाऱ्यांना मुंबईकरांनी नाकारलं"...
निकालांवर भाष्य करताना नितेश राणे यांनी मंत्र्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. "उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या दिवशी शाई पुसल्याचे जे रडगाणे गायले होते, त्याला मुंबईकरांनी चोख उत्तर दिले आहे. मुंबईकरांनी काम करणाऱ्या 'महायुती'ला पसंती दिली असून, घरात बसून राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे," असे राणे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र येऊनही महायुतीला रोखू शकले नाहीत, याकडे नितेश राणे यांनी लक्ष वेधले. "२० वर्षांनंतर दोन भाऊ एकत्र आले तरीही त्यांना १०० चा आकडाही गाठता आला नाही. हेच महायुतीचे यश आणि त्यांच्या नेतृत्वाचे अपयश आहे," अशी बोचरी टीका त्यांनी केली. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून नितेश राणे यांच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.






