Friday, January 16, 2026

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात सलग दुसऱ्यांदा घसरण 'या' कारणामुळे घसरण

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात सलग दुसऱ्यांदा घसरण 'या' कारणामुळे घसरण

मोहित सोमण: आज नवा विशेष ट्रिगर दुपारपर्यंत नसल्याने व विशेषतः डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारातील कमोडिटीवर दबाव घसरला असून सोने व चांदीच्या दरात सलग दुसऱ्यांदा घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २२ रुपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २० रुपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १७ रूपयाने घसरण झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४३४० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दर १३१४५ रूपये, १८ कॅरेटसाठी १०७५५ रुपयांवर दर पोहोचला आहे. तसेच संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात २२० रूपये, २०० रूपये, १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १७० रुपयाने उसळला आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४३४००, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा १३१४५०, १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १०७५५० रूपयांवर पोहोचला.भारतीय सराफा बाजारात मुंबईसह इतर महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर १४३४० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १३२३० रूपये, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १०७५५ रूपयावर पोहोचला. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचा निर्देशांक संध्याकाळपर्यंत ०.०७% किरकोळ वाढत १४३२१८ रुपये दरपातळीवर पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही घसरण !

जागतिक अस्थिरतेत आज घट झाल्याने त्याचा फायदा चांदीच्या दरातही गुंतवणूकदारांना झाला. मोठ्या प्रमाणात अस्थिरतेत सोन्यासह चांदीचे हेजिंग वाढले होते. मोठ्या प्रमाणात वाढ कायम असताना फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीतील अस्थिरता कायम होती. त्यामुळे चांदीच्या औद्योगिक मागणीसह घरगुती मागणीतही वाढ झाली. त्यामुळे डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने रूपयात घसरण कायम राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा संध्याकाळी निर्देशांकात वाढ सुरु झाली तरी दिवसभरात चांदीत घसरण झाली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, प्रति ग्रॅम दर ३ रुपयांनी घसरला असून प्रति किलो दर ३००० रूपयांनी घसरला आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर चांदीसाठी २९२ रूपये व प्रति किलो दर २९२००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२३% वाढ झाली असून दरपातळी २९२२४३ रूपयांवर पोहोचली आहे.

Comments
Add Comment