पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक ११, १२ आणि १३ मधील मतमोजणीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी केंद्रांवर आवश्यक कर्मचारी, निवडणूक साहित्य तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर प्राथमिक कल समोर येण्याची शक्यता असून टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जाणार आहेत.

दरम्यान, उमेदवार, कार्यकर्ते तसेच नागरिक निकालाबाबत उत्सुक आहेत. या निकालांचा पनवेल महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

Burgman 2026 Maxi-Scooter : भारतामध्ये सुझुकीची नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च

मुंबई : जपानी वाहन निर्माता कंपनी सुझुकीने भारतात आपली नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ