Saturday, February 7, 2026

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू
पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक ११, १२ आणि १३ मधील मतमोजणीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी केंद्रांवर आवश्यक कर्मचारी, निवडणूक साहित्य तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर प्राथमिक कल समोर येण्याची शक्यता असून टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, उमेदवार, कार्यकर्ते तसेच नागरिक निकालाबाबत उत्सुक आहेत. या निकालांचा पनवेल महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment