११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात उतरलेल्या महायुतीने मतमोजणीच्या पहिल्या तासातच आपली ताकद दाखवून दिली आहे. २२७ जागांसाठी सुरू असलेल्या या महासंग्रामात भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अत्यंत प्रभावी सुरुवात केली असून, अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
महायुतीची भक्कम आघाडी
मतमोजणीच्या पहिल्या एका तासातील कलानुसार, भाजपने ११ जागांवर, तर शिवसेना शिंदे गटाने १० जागांवर आघाडी घेतली आहे. म्हणजेच महायुती एकत्रितपणे २१ जागांवर आघाडीवर असून, हा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. मुंबईच्या विकासाचा आणि 'डबल इंजिन' सरकारचा अजेंडा मुंबईकरांना भावल्याचे प्राथमिक चित्र या कलांमधून स्पष्ट होत आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले. संध्याकाळपर्यंत ५४ लाख ७६ ...
एक्झिट पोलचा महायुतीलाच कौल
निकालापूर्वी समोर आलेल्या 'जनमत'च्या एक्झिट पोलने महायुतीला १३८ जागांसह स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवला होता. सुरुवातीचे कल पाहता, हा अंदाज वास्तवात उतरण्याची शक्यता दाट झाली आहे. मुंबईची सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला ११४ हा बहुमताचा आकडा महायुती सहज पार करेल, असा विश्वास भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
विरोधकांच्या युतीला महायुतीचं आव्हान
तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना आणि त्यांच्या मदतीला धावून आलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीने कडवे आव्हान दिले आहे. विशेषतः मराठी बहुल पट्ट्यात शिंदे गटाने लावलेली ताकद आणि गुजराती-उत्तर भारतीय मतदारांनी भाजपला दिलेला भरघोस पाठिंबा यामुळे महायुतीचे पारडे जड झाले आहे. मुंबईच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महायुतीची सत्ता गरजेची असल्याचा प्रचार भाजपने केला होता. त्याला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. दुपारपर्यंत येणाऱ्या निकालांमध्ये महायुतीचा विजयाचा गुलाल उधळला जाण्याची दाट शक्यता असून, 'मुंबईचा नवा महापौर' महायुतीचाच असेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.






