Saturday, March 14, 2026

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी  एकूण ७,१७,१०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण ५२.११% मतदान !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी  एकूण ७,१७,१०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण ५२.११% मतदान !
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी दि.15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ५२.११% टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण 30 प्रभागांमध्ये (प्रभाग क्र.24 बिनविरोध असल्यामुळे) एकूण १,५४८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. या 30 प्रभागांमध्ये ७,२०,६७५ पुरूष, ६,५४८७२ महिला आणि ५५२ इतर असे एकूण १३,७६,०९९ मतदार होते. त्यापैकी ३,८३,५२४   पुरूष , ३,३३,४८० स्त्री आणि १०३ इतर असे एकूण ७,१७,१०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Comments
Add Comment