Friday, January 16, 2026

महाडमध्ये ५ गट आिण १० गणांसाठी २०३ मतदान केंद्र

महाडमध्ये ५ गट आिण १० गणांसाठी २०३ मतदान केंद्र

१६ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

महाड वार्तापत्र

संजय भुवड महाड : तालुक्यात ५ जिल्हा परिषद आणि १० पंचायत समिती गणासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. १६ ते २१ जानेवारीपर्यत नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत आहे. तालुक्यात एकुण २०३ मतदान केंद्र असून प्रत्येक झोनमध्ये राखीव मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकी दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी आचार संहितेचे पालन करावे असे आवाहन महाडचे प्रांताधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी पोपट ओमासे यांनी पत्रकार परिषदेतून केले. यावेळी महाडचे तहसिलदार महेश शितोळे, पोलादपूर तहसिलदार घोरपडे, महाडचे गट विकास अधिकारी पाटील उपस्थित होते.

तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्म धरली जाणार असून यानुसार महाड तालुक्यात एकुण १ लाख ३९ हजार ४४६ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार ६९ १८५ व स्त्री मतदार ७०२६१ आहेत. बिरवाडी जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असून या मतदार संघात एकूण २७८९२ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष १३९८१ व स्त्री मतदार १३९११ आहेत. या गटात धामणे व बिरवाडी असे दोन पंचायत समिती गण असून धामणे गण अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या गणात १५४९८ मतदार असून त्यामध्ये पुरुष ७७५१ व स्त्री मतदार ७७४७ आहेत. बिरवाडी गण सर्व साधारण प्रवर्गासाठी राखीव असून या गणात १२३९४ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष ६२३० व स्त्री मतदार ६१६४ आहेत. खरवली जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)साठी राखीव असून या गटात २७१९७ मतदार आहेत त्यामध्ये पुरुष १३७७४ व स्त्री मतदार १३४८५ आहेत. या गटात वरंध व खरवली हे दोन पंचायत समिती गण असून वरंध गण सर्व साधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे या गणात १३३७५ मतदार असून त्यामध्ये पुरुष ६८६९ व स्त्री मतदार ६५०६ आहेत. खरवली गण नामाप्र स्त्री साठी राखीव असून या गणात १३८२२ मतदार आहेत त्यामध्ये पुरुष ६८४३ व स्त्री ६९७९ आहेत. नडगांव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून या गटात २७९६४ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष १३७७४ व स्त्री १४१९० मतदार आहेत. या गटात नडगांव तर्फे बिरवाडी व नाते हे पंचायत समिती गण असून नडगाव तर्फे बिरवाडी हा गण सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणात १२३९१ मतदार असून त्यामध्ये पुरुष ६१९१ व स्त्री ६२०० मतदार आहेत. नाते गण हा सर्व साधारण प्रवर्गासाठी राखीव असून या गणात १५५७३ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष ७५८३ व स्त्री ७९९० मतदार आहेत.

दासगांव जिल्हा परिषद गट हा नामाप्र साठी राखीव असून या गटात २८६८६ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष १४०४९ व स्त्री १४६३७ मतदार आहेत. या गटात दासगांव व अप्पर तुडील हे पंचायत समिती गण असून दासगांव गण हा नामाप्र साठी राखीव आहे. या गणात १४६६१ मतदार असून त्यामध्ये पुरुष ७१५९ व स्त्री ७५०२ मतदार आहेत. अ. तुडील गण सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून या गणात १४०२५ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष ६८९० व स्त्री ७१३५ मतदार आहेत. करंजाडी जिल्हा परिषद गट सर्व साधारण प्रवर्गासाठी राखीव असून या गटात २७७०७ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष १३६६९ व स्त्री १४०३८ मतदार आहेत. या गटात करंजाडी व विन्हेरे हे पंचायत समिती गण असून करंजाडी गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणात १३४५४ मतदार असून त्यामध्ये पुरुष ६७१८ व स्त्री ६७३६ मतदार आहेत . विन्हेरे गण हा सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून या गणात १४२५३ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष ६९५५ व स्त्री ७३०२ मतदार आहेत.जिल्हा परिषदेच्या खुल्या गटातील उमेदवाराला १००० व इतर गटातील उमेदवारांना ५०० रुपये डिपॉझीट तर पंचायत समितीसाठी खुल्या गटातील उमेदवाराला ७०० रुपये तर इतर गटातील उमेदवाराला ३५० रु डिपॉझीट जमा करावे लागणार आहेत. जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा ४ लाख तर पंचायत समितीचे उमेदवाराला खर्च मर्यादा ३ लाखाची आहे. या मतदारांना शहरी भागात मतदान केले असेल तर ग्रामिण भागात मनदान करता येणार नाही असे ओमासे यांनी सांगितले.

Comments
Add Comment