प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. मेळ्याच्या मुख्य स्नानासाठी भक्तीचा असा काही महापूर लोटला की, संपूर्ण परिसर जनसागराने ओसंडून वाहत होता. या अथांग गर्दीचे फोटो पाहून अनेकांना गेल्या महाकुंभमेळ्याची प्रकर्षाने आठवण होत आहे.
पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानानंतर केलेल्या ...
उभे राहण्यासाठीही जागा मिळेना
संगम तटावर पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. गर्दी इतकी प्रचंड होती की, घाटांवर उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार, भाविकांच्या या संख्येने एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. रस्ते, रेल्वे स्थानके आणि बस स्थानके सर्वत्र केवळ मानवी डोकीच दिसत होती. या अलोट गर्दीला नियंत्रित करताना सुरक्षा यंत्रणांचीही मोठी कसरत झाली.
महाकुंभमेळ्याची प्रचिती
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेळ्याच्या ड्रोन फोटोंनी जगभरातील भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गंगेच्या विस्तीर्ण पात्रात आणि वाळवंटात पसरलेले भाविकांचे तंबू, दिव्यांची रोषणाई आणि स्नानासाठी झालेली गर्दी हुबेहूब महाकुंभमेळ्यासारखीच भासत आहे. "हे केवळ माघ स्नान नसून, भक्तीचा जागतिक सोहळा आहे," अशा भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रशासकीय नियोजन आणि आव्हाने
उत्तर प्रदेश सरकारने या गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी वैद्यकीय शिबिरे, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त भाविक आल्याने संपूर्ण यंत्रणेवर मोठा ताण आला. भक्तीच्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी केवळ उत्तर भारतच नव्हे, तर जगभरातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.






