Thursday, January 15, 2026

आज मतदानदिनी मेट्रो-३ मध्यरात्रीपर्यंत धावणार

आज मतदानदिनी मेट्रो-३ मध्यरात्रीपर्यंत धावणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आज १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई सज्ज झाली आहे. मतदानाच्या कार्यात गुंतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुंबई मेट्रोच्या 'अॅक्वा लाईन'ने (मेट्रो-३) कंबर कसली असून, गुरुवारी विशेष अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ५ ते रात्री १२ पर्यंत सेवानिवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी मेट्रोची सेवा पहाटे ५.०० वाजल्यापासूनच सुरू होईल. तसेच, रात्री उशिरापर्यंत कामावरून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत देण्यात आली.

Comments
Add Comment