Thursday, January 15, 2026

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या मालगाडीचे दोन डबे अचानक रुळावरून घसरल्याने (Derailment) मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे रेल्वे रुळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नेमकी घटना काय?

नेल्लोर जिल्ह्यातून जात असताना मालगाडीच्या डब्यांचा ताबा सुटला आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले. अपघाताचा आवाज होताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ताडीने धोक्याचा इशारा दिला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने, ही मालगाडी असल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
डबे रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले आहे. सध्या गॅस कटर आणि क्रेनच्या साहाय्याने घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेमुळे या मार्गावरून जाणाऱ्या काही प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची किंवा काही गाड्या थांबवून ठेवण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृतरीत्या गाड्यांच्या रद्दबातल प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रेल्वे अपघातांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, २ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील निलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा मोठा अपघात थोडक्यात टळला होता. त्यावेळी रेल्वेला गुरे धडकल्याने इंजिनचा पुढचा भाग खराब झाला होता. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नव्हती. मात्र, नेल्लोरमधील आजच्या घटनेने रेल्वेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >