मुंबई : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीस) आपल्या अंतरिम अभ्यास अहवालात दिली आहे. १९६१ मध्ये मुस्लिम लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ८% होती. २०११ मध्ये ती २१% झाली. आज २०२५ पर्यंत मुस्लीम लोकसंख्या सुमारे २८-३० लाख (अंदाजे २२-२४% टक्केवारी) असण्याची शक्यता आहे.
अतिरेकी जन्मदर आणि बांगलादेश आणि रोहिंग्या मुसलमान यांच्या प्रचंड संख्येने होणाऱ्या अवैध घुसखोरीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर मुस्लीम लोकसंख्या मुंबईत २०५१ पर्यंत अंदाजे कमीत कमी ३०% पेक्षा जास्त असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताचा विचार करता १९५१ साली भारतात मुस्लीम टक्केवारी ९.८% ते ९.९% म्हणजे सुमारे ३.५४ कोटी इतकी होती. १९५१ ते २०११ दरम्यान मुस्लीम लोकसंख्या सुमारे ५ पट वाढली (३.५ कोटी ते १७.२ कोटी), तर एकूण लोकसंख्या ३.३ पट वाढली. २०२५ पर्यंत भारतात २०.२५ कोटी मुस्लीम लोकसंख्या असेल असा अंदाज आहे.
बांगलादेशी मुस्लिमांची संख्या वेगाने वाढतेय : आज मुंबईत कागदपत्र नसलेले बेकायदेशीर घुसखोर बनावट मतदार ओळखपत्र मिळवत असल्याचे देखील या अहवालात उघड झाले आहे. टीसच्या अहवालानुसार मुंबईतील वाढत्या मुस्लीम लोकसंख्येमागे नैसर्गिक जन्मदर हिंदू १.८, मुस्लीम २.५ हा नाही. तर दर वर्षी कमीत कमी १ लाखांहून अवैध घुसखोर मुंबईत आणून स्थिरावले जात आहेत हे मूळ कारण आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईला मुस्लीम बहल करण्याच्या आंतरराष्ट्रीय कटाचा हा एका महत्त्वाचा भाग म्हणून बांगलादेश आणि बंगालमार्गे राहिंग्या आणि इतर मुस्लीम समुदायांना भारतात घुसवून त्यांना मुंबईच्या झोपडपट्ट्यांत रुजवले जात आहे. ठाकरे सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांचे मित्र मालवणी या मुस्लीम बहल भागाचे आमदार मुंबईचे पालकमंत्री बनले. तेव्हापासून तर मुंबईत बांगलादेशी मुस्लिमांची संख्या प्रचंड वेगाने वाढू लागल्याचे निदर्शनास येत आहे.
बांगलादेशी घुसखोरांना अटकाव करणे आवश्यक बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे रुग्णालये, शाळा, पाणी यासारख्या व्यवस्थांवर ३०% अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. राष्ट्रीय विचारांचा, हिंदुत्व मानणारा राजकीय पक्ष जर महापालिका निवडणूकीत निवडून आला नाही तर मुंबईतही बंगालसारखे सगळे प्रकार सर्रास सुरू होणार आहेत. बांगलादेशी घुसखोरीला ज्या पक्षाचे नेते अटकाव करू पाहतात ते आपले नेते, तोच आपला पक्ष असा विचार करून यावेळी हिंदू समाजाने मतदान करणे आवश्यक आहे.