मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज, १५ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. बोटावर लावलेली शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करणे हे एक गंभीर गैरकृत्य असून, अशा व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, एखाद्या मतदाराने शाई पुसून पुन्हा मतदान केंद्रावर येण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला पुन्हा मतदान करता येणार नाही. मतदाराने एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद अधिकृतरीत्या केली जाते. त्यामुळे केवळ शाई पुसल्याने कोणीही दुसऱ्यांदा मतदान करू शकणार नाही, याबाबत सर्व निवडणूक केंद्रांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
View this post on Instagram
मुंबई : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता, मुंबई बंदर प्राधिकरणाने 'हरित बंदर' (Green Port) बनण्याच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार 'मार्कर पेन'चा वापर केला जातो. या मार्कर पेनने शाई लावण्याचे विशेष नियम आहेत. बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीने शाई लावली जावी. नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर ३-४ वेळा घासून शाई लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मार्कर पेनवरही या सूचना स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करणे हे चुकीचे आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अशा प्रकारचे गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.






