Thursday, January 15, 2026

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional Placement QIP) मार्फत उभारण्याचे घोषित केले आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये संबंधित माहिती दिली असून या फार्मा कंपनीने आज पात्र संस्थात्मक प्लेसमेंट (QIP) यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा यानिमित्ताने केली. या अंतर्गत पात्र संस्थात्मक खरेदीदारांना प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्याचे ११२,६६४,५८५ इक्विटी शेअर्स ३६८.३५ रुपये प्रति इक्विटी शेअर (३६३.३५ रुपये प्रति इक्विटी शेअर प्रीमियमसह) या दराने जारी करून ४१५० कोटी रुपये (सुमारे ४६० दशलक्ष डॉलर्स) निधीची गुंतवणूक उभारली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.दोन दिवसीय १२ जानेवारी २०२६ रोजी सुरू झालेला आणि १४ जानेवारी २०२६ रोजी बंद झालेला हा क्यूआयपी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात उभारला गेल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीकडून आपल्या विस्तारासाठी व नव्या उत्पादन निर्मितीसाठी ही निधी उभारणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

कंपनीने मिळालेल्या निधीचा वापर प्रामुख्याने बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेडमधील मायलॅन इंक. (वायट्रिस) चा हिस्सा खरेदी करण्यासाठी देय असलेली रोख रक्कम देण्यासाठी केला जाईल असे आपल्या निवेदनात म्हटले. ज्यात या संदर्भात घेतलेल्या कर्जाची परतफेड देखील समाविष्ट कंपनीने केली आहे. बायोकॉनने नुकतीच तिच्या संचालक मंडळाने वायट्रिसच्या हिस्स्यासह उर्वरित सर्व अल्पसंख्याक भागभांडवल संपादन करण्यासाठी (Buyback) साठी एका धोरणात्मक निर्णयाला मंजुरी दिली होती. ज्यामुळे आता बायोकॉन बायोलॉजिक्स ही कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी (Subsidiary) बनणार आहे.

बायोकॉनच्या मधुमेह, कर्करोग आणि रोगप्रतिकारशास्त्र या उपचारात्मक क्षेत्रांमध्ये बायोसिमिलर्स, इन्सुलिन, जेनेरिक आणि पेप्टाइड्स (GLP-1s) च्या वेगळ्या पोर्टफोलिओद्वारे नेतृत्व करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असेही कंपनीने पुढे म्हटले. ही एकत्रीकरण प्रक्रिया ३१ मार्च, २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कंपनीला ३१ डिसेंबर, २०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत निधी उभारणीसाठी भागधारकांची मंजुरी मिळाली.

आता नव्या QIP ला देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, देशांतर्गत विमा कंपन्या आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs)यांसारख्या सर्व प्रकारच्या भांडवलाकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून हे बायोकॉनच्या वेगळ्या व्यवसाय मॉडेलवरील आणि एकत्रित व्यवसायाच्या वाढीच्या संभाव्यतेवरील गुंतवणूकदारांचा विश्वास अधोरेखित करते असही निधी उभारणीबाबत कंपनीने म्हटले. कंपनीच्या माहितीप्रमाणे एकूण ३९ गुंतवणूकदारांकडून स्वारस्य दिसून आले आणि सर्व ३९ गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले.एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, मिराई ॲसेट म्युच्युअल फंड, बिर्ला म्युच्युअल फंड, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, जेपी मॉर्गन ॲसेट मॅनेजमेंट यासह वित्तीय संस्थांचा या निधी उभारणीत समावेश होता.

माहितीनुसार, क्यूआयपीमधून मिळालेल्या निव्वळ रकमेचा वापर खालील गोष्टींसाठी केला जाईल

बायोकाॅन बायोलॉजिक्स लिमिटेडचे शेअर्स अधिग्रहित करण्यासाठी मायलॅन इंक. (वायट्रिस) यांना रोख मोबदला देणे,या संदर्भात घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जाणार

एडलवाईसकडे (Edelweiss) असलेल्या बायोकाॅन बायोलॉजिक्स लिमिटेडच्या कंपल्सरी कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (सीसीडी) च्या अधिग्रहणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड.

सामान्य दैनंदिन कॉर्पोरेट उद्देशांसाठी

२००४ मध्ये सार्वजनिकरित्या सूचीबद्ध झालेली बायोकाॅन लिमिटेड जागतिक दर्जाची बायोफार्मास्युटिकल कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने मधुमेह, कर्करोग आणि ऑटोइम्यून सारख्या जुनाट आजारांसाठी जटिल परवडणारी औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठी उत्पादन करते. कंपनीने आतापर्यंत भारत आणि अनेक प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्ये नवीन बायोलॉजिक्स, बायोसिमिलर्स आणि जटिल लहान रेणू एपीआय विकसित आणि व्यावसायिकरित्या उपलब्ध केले आहेत. कंपनीचा बाजार बेस अमेरिका, युरोप आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये असून जेनेरिक फॉर्म्युलेशन्स इम्युनोथेरपीमध्ये कंपनी कार्यरत आहे.

Comments
Add Comment