Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा एकत्र लवकरच एक रिॲलिटी शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. अशा अनेक बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. व या वरुन सोशल मिडीयावर चर्चांना उधान आलं आहे..मात्र आता स्वतः युजवेंद्र चहलने या सर्व अफवांवर स्पष्ट शब्दांत विराम दिला आहे. चहलने अपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया देत चहलने या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. “मी कोणत्याही रिॲलिटी शोमध्ये सहभागी होत नाही. माझा ‘द 50’ किंवा इतर कोणत्याही शोशी कोणताही संबंध नाही. यासंदर्भात माझ्याशी कोणतीही चर्चा किंवा कमिटमेंट झालेली नाही,” असे त्याने स्पष्ट केले. सोशल मीडिया आणि मीडियामधून पसरवण्यात येणाऱ्या अपुष्ट बातम्यांवर विश्वास ठेवू नये, तसेच माहिती शेअर करण्यापूर्वी ती पडताळून पाहावी, असे आवाहनही चहलने केले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर धनश्री वर्मा हिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिचे मौन कायम असून ती या अफवांवर काय बोलणार, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ‘द 50’ या रिॲलिटी शोचा प्रीमिअर 1 फेब्रुवारी रोजी होणार असून प्रसिद्ध दिग्दर्शक-कोरिओग्राफर फराह खान हा शो होस्ट करणार आहे. हा शो भारतीय रिॲलिटी टीव्हीमधील पारंपरिक साच्याला छेद देईल, असा दावा फराह खानने केला आहे. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचे डिसेंबर 2020 मध्ये गुरुग्राम येथे लग्न झाले होते. कोविड-19 महामारीच्या काळात चहलने धनश्रीकडून नृत्य शिकण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच दोघांची जवळीक वाढली. मात्र जून 2022 मध्ये ते वेगळे झाले आणि मार्च 2024 मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर चहल दुबईमध्ये आरजे महवाशसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहताना दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत अटकळी बांधल्या गेल्या. मात्र आरजे महवाशने ते फक्त चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये धनश्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर मोकळेपणाने भाष्य केल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली होती.






