मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात अस्थिरता ही जागतिक अस्थिरतेमुळे कायम राहिली असून सकाळी सेन्सेक्स १०७.६६ व निफ्टी ४६.०५ पातळीवर झाली आहे. दोन्ही बँक निर्देशांकातही घसरण कायम राहिली असून मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणशी अपेक्षित असलेल्या उच्चपदस्थ बैठकीला अखेरच्या क्षणी उपस्थित राहण्यास नकार दिला असून त्यांच्या नव्या चर्चित विधानामुळे शेअर बाजारातील अस्थिरता आणखी वाढली असून सकाळच्या सत्रात सोने नव्या उच्चांकावर पोहोचले आहे. कमोडिटी बाजारातील अस्थिरता कायम असताना आगामी तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मेटल, तेल व गॅस, मिड स्मॉल हेल्थकेअर निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण ऑटो, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, आयटी, रिअल्टी शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमएमटीसी (७.६३%), बीएलएस इंटरनॅशनल (५.३१%), एचएफसीएल (४.४७%), वेदांता (३.२३%), एचईजी (३.०६%), हिंदुस्थान झिंक (२.६७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण औथम इन्व्हेसमेंट (३.०४%), कल्याण ज्वेलर्स (२.७१%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (२.७०%), ब्रेनबीज सोलूशन (२.४०%), टाटा इलेक्सी (२.१०%), सुंदरम फायनान्स (१.९२%), स्विगी (१.६७%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी आपली स्ट्रेटजी कशी ठेवावी?
जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार- २०२६ वर्षाच्या सुरुवातीपासून भू-राजकीय घटना जागतिक बातम्यांवर वर्चस्व गाजवत आहेत. यापैकी काही घटनांचा बाजारांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, परंतु बाजारांवर अद्याप लक्षणीय परिणाम झालेला नाही. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५% शुल्क लावण्याच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशाचा भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण भारत-इराण व्यापार सुमारे १.६ अब्ज डॉलर्स इतका कमी आहे. चीनवर याचा मोठा परिणाम होईल. इराणी संकट कसे उलगडेल आणि इराणमधील घडामोडींवर अमेरिका कशी प्रतिक्रिया देईल हे पाहणे बाकी आहे. ट्रम्प यांनी शुल्काचा एक शस्त्र म्हणून वापर केल्यामुळे, जगाला काही काळासाठी शुल्क-ग्रस्त व्यापार प्रणालीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक कधीकधी निराशाजनक असू शकते; ती दीर्घकाळ निराश करू शकते. सध्याच्या अनिश्चित आणि अस्थिर काळात हुशार गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे, तर त्यांनी गुंतवणूक कायम ठेवावी आणि दीर्घकाळासाठी योग्य मूल्यांकनाच्या दर्जेदार वाढीव शेअर्समध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवावे.






