मोहित सोमण: क्वाड्रंट फ्युचर टेक शेअर्समध्ये आज तुफान वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर इंट्राडे ९% पातळीवर उसळला असून शेअरला एक्सचेंज फायलिंगमधील नव्या अपडेटनंतर चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीला आज चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्कस कंपनीकडून नवी २८७ कोटीची नवी ऑर्डर मिळाली आहे. कवच लोको इक्विपमेट, सप्लाय, मेंटेनन्स विषयक ही ऑर्डर मिळाली असून कंपनीने ही ऑफर स्विकारल्याची माहिती कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत दिली.
या बँक ऑर्डरविषयी बोलताना कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की,कंपनीला चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सकडून ३५३ ऑनबोर्ड कवच लोको इक्विपमेंट व्हर्जन- ४.० चा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसाठी वॉरंटी आणि दीर्घकालीन वार्षिक देखभालीसह २८७८२९१४०० किमतीची ऑफर मिळाली आहे.' तत्पूर्वी कालच क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडने आयपीओच्या रकमेची प्राप्ती होण्यापूर्वी झालेल्या इश्यू खर्चाच्या पूर्तीसाठी कंपनीने आपल्या आयपीओ मॉनिटरिंग खात्यातून ८.५७ कोटी रुपये काढण्याकरिता भागधारकांची मंजुरी मिळवण्यासाठी पोस्टल बॅलेटची सूचना प्रसिद्ध केली होती. कंपनीच्या जानेवारी २०२५ मधील आयपीओद्वारे प्रति शेअर २९० रुपये दराने १ कोटी शेअर्सच्या नवीन विक्रीतून २९० कोटी रुपये उभारण्यात आले होते. ई-मतदानाची (E Voting) प्रक्रिया १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार असून, निकाल १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अपेक्षित आहे असे कंपनीने त्यावेळी म्हटले होते.
तज्ञांच्या मते कंपनीच्या शेअर्समध्ये काही आव्हाने देखील आहेत. तज्ञांनी तरीही हा क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडचा शेअर विकण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच हे दिलेले 'स्ट्रॉंग सेल' (मजबूत विक्री) रेटिंग गुंतवणूकदारांसाठी सावध भूमिकेचे संकेत देते आहेत. सध्या या स्टॉकमध्ये महत्त्वपूर्ण धोके आणि आव्हाने कायम आहेत असे तज्ज्ञ सांगतात. गुणवत्ता, मूल्यांकन, आर्थिक कल आणि तांत्रिक विश्लेषण या मापदंडावर तज्ञांनी नकारात्मकता या शेअरसाठी व्यक्त केली असून जातक्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडवर लक्ष ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या कामकाजात सुधारणा, वाढलेली नफाक्षमता आणि मूल्यांकनाच्या निकषांमध्ये स्थिरीकरण (Stabilization) यांसारख्या कोणत्याही घटकांवर लक्ष ठेवले पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात.जोपर्यंत अशा सुधारणा प्रत्यक्षात येत नाहीत तोपर्यंत हा स्टॉक त्याच्या क्षेत्रातील एक उच्च-जोखमीचा पर्याय राहील असेही पुढे ब्रोकरेज कंपन्यानी सांगितले आहे.
या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी तिमाही निकालांचा आणि बाजारातील घडामोडींचा नियमित आढावा घेणे आवश्यक असेल. गुणवत्ता, मूल्यांकन, आर्थिक कल, तांत्रिक दृष्टिकोन यांसारख्या क्षेत्रांमधील सध्याच्या आव्हानांच्या परिस्थितीचे सर्वसमावेशक मूल्यांकनाचे करणे गुंतवणूकदासांठी महत्वाचे ठरणार आहे. ब्रोकरेजकडून गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी शेअर खरेदी करताना त्यांच्या पोर्टफोलिओ आणि जोखीम सहन करण्याच्या क्षमतेसह या घटकांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करावे लागेल.
दुपारी २.२३ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ९.०६% वाढ झाली असून ३३३ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ०.८०% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात शेअरमध्ये २३.०४% वाढ झाली आहे तर एक वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये २४.९९% घसरण झाली आहे तर इयर टू डेट बेसिसवर कंपनीच्या शेअर्समध्ये १.१०% घसरण झाली आहे. क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड (QFT) कंपनी ही एक संशोधन-केंद्रित भारतीय कंपनी आहे. प्रगत ट्रेन नियंत्रण/सिग्नलिंग (जसे की भारतीय रेल्वेचे कवच) मध्ये विशेषज्ञता मिळवलेली असून रेल्वे, संरक्षण (नौदल), सौर आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रांसाठी उच्च-तंत्रज्ञानाचे विशेष केबल्स तयार करण्याचे काम कंपनी करते. पंजाबमध्ये उत्पादन सुविधा आणि बंगळूर/हैदराबादमध्ये अभियांत्रिकी केंद्रे असलेल्या या कंपनीचा उद्देश सुरक्षा आणि नावीन्यपूर्णतेला चालना देणे असून ही कंपनी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली (कवच) विकसित करते आणि रेल्वे, संरक्षण, सौर आणि इलेक्ट्रिक वाहन उपयोगांसाठी विशेष केबल्स (पॉवर, कंट्रोल, अग्निरोधक) तयार करते.






