Wednesday, January 14, 2026

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!
चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील तीन जणांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पती रमेश, त्याची पत्नी ममता आणि ५ वर्षांचा मुलगा छोटू यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत राहणारा रमेशचा भाऊ परशुराम सकाळी पहाटे हे तिघे मृतावस्थेत पाहून घाबरला आणि ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. घटनास्थळी एक शेकोटी सापडल्याची माहितीही मिळाली आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. माहितीनुसार, आदल्या रात्री ममताने हलवा बनवला होता आणि संपूर्ण कुटुंबाने तो खाल्ला. त्यानंतर सर्व झोपी गेले. पहाटे पाच वाजता परशुराम उठला, तेव्हा रमेश, ममता आणि छोटू उठलेले नव्हते. त्याने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते जागे झाले नाहीत. त्यानंतर त्याने त्याच हलव्याचा दुसऱ्या वेळा भाग घेतला, तरी परिस्थितीत बदल झाला नाही. परशुरामने पोलिसांना सांगितले की, रमेशच्या नाकातून आणि तोंडातून रक्त बाहेर आलेले होते, तर ममताच्या आणि छोटूच्या तोंडातून फेस निघाले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस सखोल चौकशी करत आहेत आणि घटना स्थळावरून मिळालेल्या शेकोटीसह इतर पुराव्यांचा अभ्यास करत आहेत. मृतकांचे शवविच्छेदन झाल्यानंतरच या भयानक घटनेमागील खरे कारण समोर येईल, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेने लोक हळहळ व्यक्त करत आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि धाकधूक निर्माण केली असून, सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >