Wednesday, January 14, 2026

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला आहे. २६.५१ कोटी मूल्यांकन असलेल्या आयपीओला पहिल्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ०.०३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, सकाळपर्यंत रिटेल गुंतवणूकदारांकडून ०.०५ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.०२ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले आहे. माहितीनुसार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार अथवा एक्स अँकर यांच्याकडून ४६००० शेअरपैकी अद्याप एकही शेअर सबस्क्राईब झाला नसून विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) २१९०००० शेअरसाठी केवळ ३८००० शेअर्ससाठी बिडींग लावण्यात आले आहे. रिटेल गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक २१८०००० शेअरसाठी १०४००० शेअरचे बिडींग प्राप्त झाले. त्यामुळे एकूण सबस्क्रिप्शन ४४१६००० शेअर्सपैकी १४२००० शेअरचे बिडींग कंपनीला मिळाले आहे. आज १४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ पर्यंत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. यापूर्वी कंपनीने प्राईज बँड ५५ ते ५७ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.

Sobhagya Capital Options Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Skyline Financial Services Pvt Ltd कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. तर मार्केट मेकर म्हणून MMM Securities आयपीओचे काम पाहिल. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २२८००० शेअरची गुंतवणूक आयपीओत करणे बंधनकारक करण्यात आले आहे म्हणजेच त्यांना एकूण २००० शेअर खरेदी करावे लागतील. २२ जूनला कंपनी एनएसई एसएमई (NSE SME) वर सूचीबद्ध (Listed) होणार आहे.

ऑगस्ट १९९९ मध्ये स्थापन झालेल्या आर्मर सिक्युरिटी इंडिया सशस्त्र सुरक्षा रक्षक मनुष्यबळ सेवा आणि सल्लागार सेवांसह विविध प्रकारच्या सुरक्षा सेवा प्रदान करते‌. प्रामुख्याने ज्यामध्ये विविध क्षेत्रांमधील व्यावसायिक आणि निवासी सुरक्षा गरजावर कंपनी पर्याय उपलब्ध करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना सुरक्षा नियोजन आणि व्यवस्थापन सेवांसह एक सर्वसमावेशक खाजगी सुरक्षा सेवा प्रदान करते. कंपनी कॉर्पोरेट, औद्योगिक, बँकिंग, आरोग्यसेवा, सरकारी, शिक्षण आणि विद्यापीठे यांसारख्या क्षेत्रांसाठी अनुरूप अशा वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी सेवा देखील पुरवते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवली गरजेसाठी (Working Capital Requirments), काही थकबाकी चुकती करण्यासाठी व प्रीपेमेंट करण्यासाठी, भांडवली खर्चासाठी (Capital Expenditures) व दैनंदिन कामकाजासाठी (Corporate Purposes) करण्यात येणार असल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले होते. विनोद गुप्ता व अर्निमा गुप्ता हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ९६.१६ कोटी रुपये आहे.

Comments
Add Comment