Wednesday, January 14, 2026

सोन्याचांदीत 'हाहाःकार' सोने १ दिवसात प्रति तोळा १०९० रूपयांने तर चांदी १५००० उसळत २९०००० प्रति किलोवर

सोन्याचांदीत 'हाहाःकार' सोने १ दिवसात प्रति तोळा १०९० रूपयांने तर चांदी १५००० उसळत २९०००० प्रति किलोवर

मोहित सोमण: सलग चौथ्यांदा सोन्यातचांदीत हाहाःकार निर्माण झाला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीवरील अनिश्चितता व इराण युएस यांच्यातील तोडगा न निघाल्याने कमोडिटीतील साशंकता कायम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचांदीच्या स्पॉट फ्युचर बेटिंगमध्ये वाढ केल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीच्या दरात आज आणखी एक उच्चांक गाठला गेला आहे. चांदीने तर प्रथमच ९० डॉलर प्रति औंसची पातळी पार केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चांदी गेल्या दोन दिवसात २०००० पेक्षा अधिक उसळली असून सोन्यातही प्रति ग्रॅम दरात दोन दिवसात २००० रूपयांपेक्षा तुफान वाढ कायम राहिली आहे. जागतिक अशांततेत ईपीएफ गुंतवणूकीत प्राधान्य मिळत असताना भौतिक कमोडिटीतील मागणीतही सातत्याने वाढ होत आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०९ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४३६२ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १३१६५ रूपये, १८ कॅरेटसाठी १०७७२ रूपयांवर पोहोचले आहेत. तर संकेतस्थळावरील माहितीत, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १०९० रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १००० रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८२० रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४३६२०, २२ कॅरेटसाठी १३१६५० रूपये, १८ कॅरेटसाठी १०७७२० रूपयांवर गेला आहे.

मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४३६२ रूपये, २२ कॅरेटसाठी १३१६५ रुपये, १८ कॅरेटसाठी १०७७२ रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) निर्देशांक दुपारी १.३० वाजेपर्यंत ०.७७% वाढ झाली आहे. त्यामुळे दरपातळी १४३३३० रूपयांवर पोहोचली. सकाळच्या सत्रातच जागतिक सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. विशेषतः युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी बैठक घेण्याचे टाळल्यानंतर बाजारात मोठी अस्थिरता वाढली. इराण बरोबर बैठक घेणे अपेक्षित असताना त्यांनी अनुपस्थिती दर्शवित मार्ग निघू शकतो इतकेच म्हटले. त्यामुळे आणखी कमोडिटीतील परिस्थिती अस्थिर राहीली. डॉलर निर्देशांकात किरकोळ घसरण झाल्याने कमोडिटीतील विशेषतः सोन्याच्या चांदीच्या दरात वाढला. एकीकडे युएस फेडरल रिझर्व्ह कुक यांना काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केले असताना ट्रम्प व फेडरल बँकेत खटला सुरू झाला असताना त्यावर आगामी काळात निर्णय अपेक्षित आहे. मात्र एकीकडे रोजगाराची किरकोळ आकडेवारी आल्यानंतर आता युएस अतिरिक्त टॅरिफचे प्रकरण अथवा ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधातील जनहित याचिकेवर या आठवड्यातच सुनावणी होणार आहे. त्यामुळे फेड दरात अनिश्चितता कायम राहू शकते त्यामुळे बाजारातील कमोडिटीवर आणखी विपरित परिणाम होत आहे.

दुपारी गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.८६% वाढ झाली असून युएस गोल्ड स्पॉट दरात ०.९०% वाढ झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ४६२५.६० औंसवर गेली आहे. सकाळी सोन्याने १% उसळत ४६४०.१३ औंसचा नवा उच्चांक गाठल्यानंतर सोने आणखी कडाडले. आगामी युएस महागाई दराचे प्रदर्शन लवकरच अपेक्षित असल्याने युएस बाजारातील अनिश्चितता आणखी वाढली.

चांदीच्या दरातही नवा विक्रम!

याच संबंधित कारणांमुळे व कमी पुरवठ्यामुळे चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा प्रति किलो दरात थेट १५००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 'गुडरिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १५ रुपये, व प्रति किलो दरात १५००० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १९० रुपयांवर गेले असून प्रति किलो दरपातळी २९०००० रूपयांवर पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणात चांदीच्या जागतिक किंमतीत वाढ होत असताना दुसरीकडे भारतीय सराफा बाजारात मोठी वाढ झाली. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २९०० रुपयांवर पोहोचले असून प्रति किलो दर २९००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत थेट ३.५४% वाढ झाली असून दरपातळी २८४९८९ रूपयांवर पोहोचली आहे. जगभरात पहिल्यांदाच चांदीने ९० डॉलर प्रति औंसची पातळी सकाळी पार केली.

एकीकडे औद्योगिक क्षेत्रात चांदीच्या मागणीत वाढ झालेली असताना युएस फेडरल रिझर्व्हच्या स्वातंत्र्याबद्दल वाढलेल्या चिंता आणि वाढलेल्या भूराजकीय जोखमींमुळे मौल्यवान धातूंनी नवीन उच्चांक गाठला. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्याविरुद्ध फौजदारी चौकशीचे अहवाल आणि फेड बँकेवरील वाढत्या राजकीय दबावानंतर सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली आहे असे तज्ञांचे मत आहे. डिसेंबरमधील रोजगार वाढीचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आल्यानंतर अमेरिकेतील व्याजदरात आणखी कपातीची अपेक्षांनीही मौल्यवान धातूंना पाठिंबा दिला होता. प्रत्यक्षात आता नव्या महागाई आकडेवारीची प्रतिक्षा सुरू झाल्याने व वाढलेली भूराजकीय अस्थिरतेच्या कारणांमुळे विशेषतः इराणमधील अशांततेमुळे चांदीच्या दरात आणखी वाढ झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >