Tuesday, January 13, 2026

उबाठाची मते विकत घेण्याची धडपड, वरळीत केले पैसेवाटप

उबाठाची मते विकत घेण्याची धडपड, वरळीत केले पैसेवाटप

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी मतदान होणार आहे. प्रचाराला अवघे काही तास उरले आहेत. या परिस्थितीत प्रत्येक उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते ताकद पणाला जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. नेमक्या अशा वेळी आपण केलेली कामं सांगत प्रचार करण्याऐवजी उबाठा उमेदवारांचे समर्थक मतदारांना पैसे वाटून मतं विकत घेण्याची धडपड करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

वरळीत प्रभाग १९३ मध्ये उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांनी महिलांना बैठकीच्या नावाखाली बोलावून थेट पैसे वाटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अपक्ष उमेदवाराने तसेच महायुतीच्या प्रभाग १९३ मधील उमेदवाराने हे आरोप केले आहेत. उबाठाकडून मतदारांना सुरू असलेल्या पैसे वाटपाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हेमांगी वरळीकर यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांनी घडलेल्या प्रकाराची दखल घेत निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांनी महिलांना पैसे वाटल्याचा आरोप सूर्यकांत कोळी यांनीही केला आहे. सूर्यकांत कोळी हे उबाठाचे माजी शाखाप्रमुख आहेत. त्यांनीच पैसे वाटपाचे व्हिडीओ समोर आणले आहेत. आता निवडणूक अधिकारी काय कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महापालिकेचे वार्षिक बजेट हे देशातल्या इतर सर्व महापालिकांपेक्षा प्रचंड मोठे आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर असल्यामुळे मुंबईला विशेष महत्त्व आहे. अशा या मुंबईच्या महापालिकेवर मागील २५ वर्षांपासून ठाकरेंच्या नेतृत्वात सत्ता राबवली जात होती. ही सत्ता यापुढेही राहणार की जाणार हे १६ जानेवारीला मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. घोडमैदान जास्त दूर नाही. यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढला आहे.

याआधी सोमवारी रात्री मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा झाली. या सभेतून महायुतीच्या नेत्यांनी उद्धव यांच्या पक्षाच्या महापालिकेतील सत्तेला थेट आव्हान दिले. उद्धव यांच्या पक्षाने सत्तेत असताना मुंबईच्या विकासाकरिता एकही योजना राबवली नाही. आधीच्या सरकारांनी सुरू केलेल्या विकास योजनांना स्थगिती देणे, सरकारी योजनांतून मलिदा खाणे असे उद्योग बिनबोभाट सुरू ठेवले. पण जनतेसाठी काम केले नाही. याउलट महायुतीने राज्यात सत्तेत आल्यापासून मुंबई तसेच राज्यातील इतरही सर्व शहरांच्या विकासाकरिता विचारपूर्वक विविध कामं करायला सुरुवात केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. महायुतीच्या प्रचारसभेला अवघे काही तास होत नाहीत तोच मुंबईत उबाठाकडून मतदारांना पैसे वाटप झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पुढे काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >