प्रतिनिधी: एकीकडे इराणसह मध्यपूर्वेतील देशावर दबाव टाकताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण देशाच्या व्यापार सहकारी देशांनाही धमकी दिली आहे. नव्या माहितीनुसार, इराणशी व्यापार करत असलेल्या देशावर त्यांनी २५% अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.तेहरान सह या मध्यपूर्वेतील देशावर दबाव निर्माण करण्यासाठी अतिरिक्त शुल्क वाढवले गेल्याचे म्हटले जाते. तेहरानमध्ये निघालेल्या मोर्चावरील दडपशाही विरोधात ट्रम्प यांनी ही कारवाई केल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले आहे. सोशल मिडिया नेटवर्कवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चीन, ब्राझील, रशिया, तुर्क या देशांचा व्यापार प्रामुख्याने इराणशी आहे. एकीकडे भारत व युएस यांच्यातील द्विपक्षीय करारावर तोडगा निघणार अशी चर्चा असताना संबंधित बातमी आल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज युएस व्हेनेझुएला यांच्यातील वादानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर स्वतः ला व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले होते.
जर आपल्या प्रशासनाला असे आढळले की इस्लामिक प्रजासत्ताक सरकारविरोधी आंदोलकांविरुद्ध प्राणघातक बळाचा वापर करत आहे, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तेहरानला लष्करी कारवाईची वारंवार धमकी दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ हे शुल्क लागू झाल्याचे घोषित केले आहे.






