प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ३ शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊयात कुठले शेअर खरेदी गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणार -
१) TCS: टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३२४० रूपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे. तसेच त्यांनी या शेअरमध्ये ३६% अपसाईड वाढीसह ४४०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे.
२) HCL Technologies: कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १६६८ रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित केली आहे.ब्रोकरेजने ३२% अपसाईड वाढीसह १६६८ रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
३) Grasim Industries: ग्रासीम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी २८०७ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. तर ब्रोकरेजने २८% अपसाईड वाढीसह लक्ष्य किंमत (Target Price TP) ३६०० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.






