नितीन तोरस्कर : कोळी, आदिवासी, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू विविध जाती-धर्माच्या लोकांचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. शिवसेना- भाजप युतीच्या काळात शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना फुटीनंतर दोन्ही सेना आमने-सामने आल्या होत्या. त्यात उबाठाचे अमोल किर्तीकर यांचा पराभव करून शिवसेनेचे रवींद्र वायकर खासदार झाले.
या लोकसभा मतदारसंघात वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव असे सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात भाजपचे दोन आमदार, उबाठाचे तीन आमदार, शिवसेना शिंदे गटाचे १ आमदार आमदार निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती असताना भाजपचे तीन व शिवसेनेचे तीन आमदार होते. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण ३९ महापालिका प्रभाग येतात. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक नगरसेवक भाजप व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले. एकेकाळी शिवसेनेचे या भागात मताधिक्य होते; परंतु शिवसेनेत दुफळीमुळे त्याचा फटका उबाठाला बसल्याने भाजपचे अंधेरी पश्चिम गोरेगाव या भागात प्रभाव दिसून येतो. वर्सोवा, दिंडोशी व जोगेश्वरी या भागात उबाठा गटाचा असला तरी, दोन शिवसेनेमुळे मोठ्या प्रमाणात मराठी मतांचे विभाजन होणार आहे. अंधेरी पूर्व येथे शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांची मोठी ताकद असल्याचे दिसून येते. बहुभाषिक असलेला हा उत्तर पश्चिम विभागातील गोरेगाव विधानसभेत मोठ्या प्रमाणात गुजराती मारवाडी यांचे प्रस्थ असून दिंडोशी भागात मराठी व मुस्लीम लोकांचे प्राबल्य आहे, तर वर्सोवा विधानसभेत कोळी समाज मुस्लीम व उच्चभ्रू लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात. रखडलेले पुनर्वसन प्रकल्प आणि म्हाडाच्या घरांचे प्रश्न असून, धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम क्षेत्रासाठी नवीन नियम लागू करण्याची मागणी होत आहे. अंधेरी आणि गोरेगावमधील वाढती वाहतूक समस्या ही लोकप्रतिनिधींनाही डोकेदुखी ठरत आहे.
चुरशीच्या लढती
गोरेगाव विधानसभा क्षेत्र
प्रभाग क्रमांक ५०
विक्रम सिंग राजपूत (भाजप), तन्वी राव (उबाठा)
प्रभाग क्रमांक ५१
वर्षा टेंभवलकर (शिवसेना), रेखा सिंग (काँग्रेस), आरती चव्हाण (राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक ५२
प्रीती सातम (भाजप), सुप्रिया गाढवे (उबाठा), संगीता खुटवड (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ५३
अशोक खांडवे (शिवसेना), जितेंद्र वाळवी (उबाठा)
प्रभाग क्रमांक ५४
विप्लव अवसरे (भाजप), अंकित प्रभू (उबाठा),
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र
दिंडोशी विधानसभा क्षेत्र
प्रभाग क्रमांक ३६
सिद्धार्थ शर्मा (भाजप), प्रशांत महाडिक (मनसे)
प्रभााग क्रमांक ३८
निकिता चाचे (शिवसेना), सुरेखा परब (मनसे)
प्रभाग क्रमांक ३९
सलम अलमेलकर (शिवसेना), तुळशीराम शिंदे (उबाठा)
प्रभाग क्रमांक ३७
प्रतिभा शिंदे (भाजप), योगिता कदम (उबाठा)
प्रभाग क्रमांक ३८
पुष्पा कळंबे (उबाठा), विनय सावंत (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ४१
सुहास वाडकर (उबाठा), पारसी पाटील (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ४२
प्रणिता निकम (उबाठा), धनश्री भरडकर (शिवसेना),
वर्सोवा विधानसभा क्षेत्र
प्रभाग क्रमांक ५९
योगीराज दाभाडकर (भाजप), यशोधर फणसे (उबाठा)
प्रभाग क्रमांक ६१
राजुल पटेल (शिवसेना), सेजल सावंत (उबाठा),
अंधेरी विधानसभा क्षेत्र
प्रभाग क्रमांक ६५
प्रसाद आयरे (भाजप), बंदेरी तिप्पाण्णा (उबाठा)
प्रभाग क्रमांक ६७
दीपक कोतेकर (भाजप), कुशल धुरी (मनसे)
प्रभाग क्रमांक ६६
आरती पंड्या (भाजप), इसाखान (उबाठा)
प्रभाग क्रमांक ६८
रोहन राठोड (भाजप), संदेश देसाई (मनसे)
वार्ड क्रमांक ६९
सुधा सिंग (भाजप), योगेश गोरे (मनसे)
अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्र
प्रभाग क्रमांक ७९
मानसी जुवाटकर (शिवसेना), सायली परब (उबाठा),
प्रभा क्रमांक ८०
दिशा यादव (भाजप) एकता चौधरी (उबाठा),
वार्ड क्रमांक ८१
केशरबेन पटेल (भाजप) मोहिनी धामणे (उबाठा)
वार्ड क्रमांक ८६
कमलेश राय (भाजप), क्लाईव्ह डायस (उबाठा)






