नवी दिल्ली:टाटा समुहाच्या छत्राखाली आल्यानंतर एअर इंडिया एअरलाईन्सने कंपनीने मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच कंपनीने विमानांचे आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम हातात घेतला असून एअरलाईन्सच्या पहिल्या बोईंग ७८७-९ (Boeing 787-9) या विमानाचे आगमन भारतातील इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळ (IGI) नवी दिल्ली येथे सोमवारी झाले आहे. वॉशिंग्टन युनायटेड स्टेट्स येथील कारखान्यापासून गंतव्य स्थानापर्यंत न थांबता १६ तासांचे प्रवास करून विमान नवी दिल्लीत उतरले आहे. नव्या तंत्रज्ञानासह मोठ्या क्षमतेच्या या विमानामुळे एअरलाईन्सचा कायापालट झालेली दिसून आला आहे.
माहितीनुसार प्रथमच, VT AWA या नोंदणीकृत नावासह विमानाने जागतिक दर्जाच्या विमान प्रवासाचा अनुभव प्रत्यक्षपणे भारतीय प्रवासी बाजारात देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीकडून सूचित करण्यात येत आहे. कंपनीच्या माहितीनुसार, २९६ आसन क्षमता असलेल्या या विमानात इकॉनॉमी, प्रिमियम इकॉनॉमी, बिझनेस क्लास अशा तीन प्रकारच्या दर्जाची आसन व्यवस्था असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच बीस्पोक केबिन इंटिरिअर (Bespoke Cabin Interiors) सह विमानातील इंटिरिअर डिझायनिंगमध्ये बदल केल्याचे सांगितले जात आहे. अत्याधुनिक असलेल्या या VT AWA विमानासह एअर इंडियाकडून आणखी Airbus A350 1000s विमानाची २०२६ मधील सुरूवातीच्या काळातील डिलिव्हरी कंपनीच्या व्यापक आधुनिकीकरणाच्या योजनेला अधोरेखित करते.
या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी आपल्या ताफ्यातील ६०% विमाने अत्याधुनिक असतील यासाठी प्रयत्न करणार आहेत. गेल्या काही वर्षात एअर इंडिया काही कारणास्तव तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर कंपनीच्या तुलनेत मागे पडली होती. परंतु व्यवस्थापनाने कंपनीला अत्याधुनिक विमानासह नव्या ब्रँड पोझिशनिंगसाठी कंपनी काम करत असल्याचे स्पष्ट होते.






