Tuesday, January 13, 2026

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण कायम 'हे' आहे कारण सेन्सेक्स १९४.५३ अंकाने व निफ्टी ६५.५५ अंकाने कोसळला

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण कायम 'हे' आहे कारण सेन्सेक्स १९४.५३ अंकाने व निफ्टी ६५.५५ अंकाने कोसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १९४.५३ अंकाने व निफ्टी ६५.५५ अंकाने घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रातच वीएक्सआय अस्थिरता निर्देशांक २% पेक्षा अधिक पातळीवर उसळल्याने बाजारातील अस्थिरता अधोरेखित होते. दुसरीकडे सकाळी मिड व स्मॉलकॅपसह फार्मा, रियल्टी, कंज्यूमर ड्युरेबल्स या निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली असून सर्वाधिक वाढ मिडिया, मेटल निर्देशांकात झाली आहे. आज इराण व युएस यांच्यातील संबंधातील तणाव, युएस बाजारातील आज अपेक्षित असलेली ग्राहक महागाई निर्देशांकातील आकडेवारी, कच्च्या तेलाच्या किमती, युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीवर अस्थिरता यामुळे बाजारात चढउतार अधिक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना बँक निर्देशांकात किरकोळ वाढ झाल्याने घसरण मर्यादित झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयटीआय (५.४२%), आयएफसीआय (४.३१%), इटर्नल (३.२३%), होम फर्स्ट फायनान्स (२.९४%), एजंल वन (२.९२%), जिंदाल स्टेन (२.८७%), एमसीएक्स (२.७३%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण लार्सन (२.३६%), ग्लेनमार्क फार्मा (१.५५%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.४७%), गोदरेज प्रोपर्टी (१.४२%), वर्धमान टेक्सटाइल (१.४०%), डॉ रेड्डीज (१.३२%), भारती हेक्साकॉम (१.२७%) समभागात झाली आहे.

आजच्या सकाळच्या सत्रपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'भूराजकीय घडामोडी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टिप्पण्या व कृतींचा बाजारांवर प्रभाव पडत राहील. ट्रम्प यांनी शुल्कांचा शस्त्र म्हणून केलेला वापर आधीच जागतिक व्यापारावर आणि विशेषतः ज्या देशांना दंडात्मक शुल्कांचे लक्ष्य केले गेले आहे, त्यांच्यावर परिणाम करत आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका २५% शुल्क लादेल, या ट्रम्प यांच्या ताज्या घोषणेने हा संदेश स्पष्टपणे मिळतो की, शुल्कांचा शस्त्र म्हणून वापर करण्याचे हे धोरण सुरूच राहील.

इतर देशांना लक्ष्य करण्याव्यतिरिक्त, ट्रम्प देशांतर्गत पातळीवरही आपल्या मताशी सहमत नसलेल्यांना लक्ष्य करत आहेत. फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्यावर लावलेले आरोप हे याचे उदाहरण आहे की, जो कोणी त्यांच्या मताशी सहमत होणार नाही, त्याच्या विरोधात ट्रम्प जातील. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे हे अभूतपूर्व, अस्थिर आणि अनपेक्षित वर्तन बाजारांवर दबाव टाकत राहील. भारतीय बाजाराच्या दृष्टिकोनातून, अमेरिका-भारत व्यापार कराराची गरज काल स्पष्ट झाली, जेव्हा अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी अमेरिका भारतासोबत व्यापार करार करण्यास कटिबद्ध आहे आणि चर्चा १३ जानेवारीपासून पुन्हा सुरू होईल, असे जाहीर केल्यावर बाजारात जोरदार उसळी आली.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा