मोहित सोमण: देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी असलेल्या टीसीएस (Tata Consultancy Services TCS) कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १२४४४ कोटी तुलनेत १०७२० कोटींवर घसरण झाली आहे. मात्र एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) डिसेंबर २४ मधील ६३९७३ कोटी तुलनेत डिसेंबर २५ पर्यंत ६७०८७ कोटींवर वाढ नोंदवली आहे. तसेच कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit after tax) इयर ऑन इयर बेसिसवर १६६६६ कोटींवरून १४४६९ कोटींवर घसरण झाली आहे. एकूण एकत्रित उत्पन्नात (Net Consolidated Income) इयर ऑन इयर बेसिसवर ११६२४ कोटी रुपये तुलनेत १११०८ कोटींवर घसरण झाली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा ईपीएस (Earnings per Share) गेल्या वर्षीच्या डिसेंबर २४ मधील ३४.३१ रूपये तुलनेत निकालानंतर डिसेंबर २५ पर्यंत २९.४५ रूपयांवर घसरला आहे. आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घोषित करत असताना कंपनीच्या भागभांडवलधारकांसाठी सलग तिसरा अंतरिम लाभांश (Interim Dividend) जाहीर केला आहे. ११ रुपयांचा लाभांश जाहीर केला गेला असून ४६ रूपये प्रति १ रूपये असलेल्या दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या शेअरवर विशेष लाभांश भागभांडवलधारकांसाठी जाहीर करण्यात आला आहे असे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये नमूद केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, या तिमाहीत सर्वच विभागांची कामगिरी स्थिर राहिली, ज्यात ०.४% ते ४% पर्यंत तिमाही बेसिसवर (QoQ) वाढ दिसून आली. एकूण महसुलात ३१.९% योगदान देणाऱ्या बीएफएसआय (BFSI) क्षेत्रात तिमाही बेसिसवर ०.९% आणि इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १.६% घट झाली. ग्राहक व्यवसाय आणि आरोग्यसेवा व्यवसायात अनुक्रमे १.३% आणि ०.९% तिमाही वाढ झाली असल्याचेही कंपनीने नमूद केले.
टीसीएस कंपनीच्या एकूण व्यवसायात प्रादेशिक स्तरावर उत्तर अमेरिकेने या तिमाहीत स्थिर वाढ कायम ठेवली, एकूण महसुलात ४८.५% योगदान दिले, जे मागील तिमाहीतील ४८.८% पेक्षा थोडे कमी आहे. लॅटिन अमेरिका आणि खंडीय युरोपमध्ये अनुक्रमे ४.६% आणि २.१% तिमाही बेसिसवर वाढ झाली, तर यूकेमध्ये १.९% घट झाली.तिमाही बेसिसवर भारतामध्ये १% ते ८% च्या दरम्यान वाढ झाली आहे.
एकूण निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृत्तिवासन म्हणाले होते की,'आम्ही दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) मध्ये पाहिलेली वाढीची गती तिसऱ्या तिमाहीत (Q3FY26) मध्येही कायम राहिली. एका सर्वसमावेशक पाच स्तंभातील धोरणाच्या मार्गदर्शनाखाली जगातील सर्वात मोठी एआयवर आधारित तंत्रज्ञान सेवा कंपनी बनण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेवर आम्ही ठाम आहोत. आमच्या एआय सेवांमधून आता वार्षिक १.८ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळत आहे, जो पायाभूत सुविधांपासून ते बुद्धिमत्तेपर्यंत संपूर्ण एआय स्टॅकमध्ये केलेल्या लक्ष्यित गुंतवणुकीद्वारे आम्ही ग्राहकांना देत असलेल्या महत्त्वपूर्ण मूल्याचे प्रतिबिंब आहे.'
दरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये करोत्तर नफ्यात (Profit after tax) मध्ये १४% घसरण झाली असली तरी सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये १% पर्यंत वाढ सकाळच्या सत्रात झाली आहे. सकाळी १०.२४ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२५% वाढ झाली असून ३२४७.५० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ०.७३% घसरण झाली असून गेल्या एक महिन्यात शेअर ०.५०% वाढला असून गेल्या वर्षभरात शेअरमध्ये २४.३३% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर मात्र १.२५% वाढ झाली आहे.






