Tuesday, January 13, 2026

Meta Layoff: मेटाकडून 'या' विभागात १०% कर्मचारी कपात जाहीर १५०० जणांना नारळ मिळणार

Meta Layoff: मेटाकडून 'या' विभागात १०% कर्मचारी कपात जाहीर १५०० जणांना नारळ मिळणार

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सेंटर प्रकल्पाकडे लक्ष दिल्याने मेटा (Meta) कंपनीने १५०० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे ठरवले आहे. असे वृत्त आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालात दिले आहे. त्यामुळे एकूण रियल्टी विभागाच्या मनुष्यबळापैकी १०% कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल असे सांगितले जात आहे. सध्या कंपनीच्या रिअल्टी लॅब्स या विभागात १५००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. त्यातील १०% कर्मचाऱ्यांची कपात केल्याने खर्च वाचवला जाणार आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इंटिग्रेटेड डेटा सेंटर विभागात गुंतवणूक वाढवत असताना दुसरीकडे मात्र गेल्या वर्षीही खर्चात कपात करण्यासाठी कर्मचारी कपात करण्याचा ट्रेंड पहिला. या कर्मचारी कपातीमुळे यंदाही हा ट्रेंड सुरू राहिले असेच प्रथमदर्शनी दिसत आहे.

मेटानेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवली असताना कंपनीने आपल्या पोर्टफोलिओत ऑगमेंटेंड रिअल्टी, वीआर (Virtual Reality) उत्पादनात गुंतवणूक वाढवत आहेत. उद्या बुधवारी या घडामोडी संबंधित मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू बोसवर्थ यांनी अंतरिम बैठक बोलावली आहे. या निर्णयाचे शिक्कामोर्तब या बैठकीत होण्याची शक्यता प्रसारमाध्यमांनी वर्तवली होती. दरम्यान हे युनिट मेटाने २०१४ साली Oculus या वीआर कंपनीचे अधिग्रहण करून आपल्या छत्रछायेखाली घेतले होते. या युनिटच्याच माध्यमातून सध्या लोकप्रिय झालेला मेटा रेबॅन स्मार्टग्लास, इतर वीआर, एआर उत्पादनांची निर्मिती केली जाते.

यापूर्वी सोमवारी, मेटाने 'मेटा कम्प्यूट' नावाच्या नवीन कार्यक्रमांतर्गत आपल्या डेटा सेंटर नेटवर्कच्या महत्त्वाकांक्षी विस्ताराची घोषणा केली.कंपनीने सांगितले की, या दशकाच्या अखेरीस 'दहा गिगावॅट्स' क्षमतेची एआय कम्प्यूट क्षमता निर्माण करण्याची त्यांची योजना आहे, ही पायाभूत सुविधा अनेक मोठ्या शहरांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विजेच्या तुलनेत ऊर्जा वापरेल.

रिॲलिटी लॅब्सभोवतीची अनिश्चितता अनेक महिन्यांपासून वाढत होती असे सांगितले जाते. डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी लिहिले होते की, या विभागासाठी नियोजित ३०% बजेट कपात मेटाच्या अंतर्गत संसाधनांच्या व्यापक पुनर्वितरणाकडे (Rebalancing of resources) निर्देश करते. जरी या निर्णयामुळे मेटाव्हर्सच्या प्रयत्नांचा तात्काळ त्याग होणार असल्याचे सूचित झाले नसले तरी,पुनर्वितरणाकडे इतर प्राधान्यक्रम अधिकाधिक लक्ष वेधून घेत असल्याचे यातून दिसून आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >