मोहित सोमण: केंद्र सरकारच्या नव्या आकडेवारीनुसार यंदाच्या ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index) महागाईत इयर ऑन इयर बेसिसवर किरकोळ वाढ झाली आहे शीर्ष महागाईत (Headline Inflation) ६२ बेसिस पूर्णांकाने वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या डिसेंबर २०२४ मधील तुलनेत यंदा डिसेंबर २०२५ मध्ये ग्राहक किंमत महागाईत (Inflation) १.३३% वाढ झाली असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने स्पष्ट केले. तर तिमाही बेसिसवर ६२ बेसिस पूर्णांकाने (bps) वाढ झाल्याचेही विभागाने यावेळी स्पष्ट केले. मात्र उपलब्ध माहितीनुसार, अन्नधान्याच्या महागाईत (Food Inflation) इयर ऑन इयर बेसिसवर -२.७१ घसरण झाली आहे. तिमाहीत मात्र नोव्हेंबर २०२५ वरून डिसेंबर २०२५ मध्ये १२० बेसिस पूर्णांकाने वाढ झाल्याचे प्रोविजनल आकडेवारीत स्पष्ट झाले. श्रेत्रीय स्तरावर आकडेवारीनुसार, अन्न महागाईत शहरी भागात व ग्रामीण भागात अनुक्रमे -२.०९%, -३.०८% पातळीने घसरण झाली. शहरी विभागात डिसेंबर २५ मध्ये डिसेंबर २४ मधील ०.१०% तुलनेत १.४०% पातळीवर महागाई पोहोचली असून ग्रामीण भागात गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ०.७६% तुलनेत या डिसेंबरमध्ये २.०३% पातळीवर महागाई स्थिरावली. महागाई वाढी भाज्या,मांस आणि मासे,अंडी,डाळी,मसाले यांच्या किरकोळ वाढीमुळे झाली आहे.
महागाईची आकडेवारी पाहता भारत अत्यंत कमी महागाईच्या परिस्थितीतून धोरणांसाठी अनुकूल क्षेत्राकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे ही सकारात्मक बाब असल्याचा तज्ञांचाही कयास आहे. जरी महागाई आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेपेक्षा कमी असली तरी महागाईत घसरती वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याने नियामकांना चिंता करण्याला फारसा वाव नाही.
महागाई आकडेवारीतील अतिरिक्त माहिती पुढीलप्रमाणे -
ग्रामीण महागाई: डिसेंबर, २०२५ मध्ये ग्रामीण क्षेत्रात मुख्य आणि अन्नधान्य महागाईमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वाढ दिसून आली. डिसेंबर, २०२५ मध्ये मुख्य महागाई ०.७६% (तात्पुरती) होती, तर गेल्या महिन्यात नोव्हेंबर २०२५ मध्ये ती ०.१०% होती. ग्रामीण क्षेत्रातील CFPI आधारित अन्नधान्य महागाई डिसेंबर, २०२५ मध्ये -३.०८% (तात्पुरती) नोंदवली गेली तर नोव्हेंबर, २०२५ मध्ये ती -४.०५% होती.
शहरी महागाई: शहरी क्षेत्राच्या मुख्य महागाईमध्ये (Headline Inflation) नोव्हेंबर, २०२५ मधील १.४०% वरून डिसेंबर, २०२५ मध्ये एक महिन्यात २.०३% (तात्पुरती) पर्यंत वाढ दिसून आली. अन्नधान्य महागाईमध्येही नोव्हेंबर, २०२५ मधील -३.६०% वरून डिसेंबर, २०२५ मध्ये -२.०९% (तात्पुरती) पर्यंत वाढ दिसून आली.
गृहनिर्माण महागाई: डिसेंबर २०२५ महिन्यासाठी वार्षिक गृहनिर्माण महागाई दर २.८६% (तात्पुरता) आहे. नोव्हेंबर, २०२५ महिन्यासाठी संबंधित महागाई दर २.९५% होता. गृहनिर्माण निर्देशांक केवळ शहरी क्षेत्रासाठी संकलित केला जातो.
शिक्षण महागाई: डिसेंबर, २०२५ महिन्यासाठी वार्षिक शिक्षण महागाई दर ३.३२% (तात्पुरता) आहे. नोव्हेंबर, २०२५ महिन्यासाठी संबंधित महागाई दर ३.३८% होता. ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांसाठी एकत्रित (Total) शिक्षण महागाई आहे.
आरोग्य महागाई: डिसेंबर, २०२५ महिन्यासाठी वार्षिक आरोग्य महागाई दर ३.४३% (तात्पुरता) आहे. नोव्हेंबर, २०२५ महिन्यासाठी संबंधित महागाई दर ३.६०% होता. ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांसाठी एकत्रित आरोग्य महागाई आहे.
जरी सीपीआय महागाई भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कमी सहनशीलतेच्या मर्यादेपेक्षा कमी राहिली असली तरी, सलग चौथ्या महिन्यात महागाई २% पेक्षा कमी राहिली असल्याने मागणीच्या दबावाऐवजी सततच्या किमतीतील स्थिरतेचे संकेत आकडेवारी देते. महत्त्वाची बाब म्हणजे, आकडेवारीवरून असे सूचित होते की महागाईने तळ (Bottom) गाठला आहे आणि आता हळूहळू सामान्यीकरणाची (Normalisation) सुरुवातीची चिन्हे दिसू लागली आहेत.






