मोहित सोमण: एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड (HCL Technologies Limited) या आयटी कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या आर्थिक माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) इयर ऑन इयर बेसिसवर ४५९४ कोटीवरून ४०८२ कोटींवर म्हणजेच ११% घसरण झाली आहे. तर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या एकूण उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर ३०३६७ कोटीवरून ३४२५७ कोटीवर मात्र वाढ झाली आहे. तसेच कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) डिसेंबर २४ मधील २९८९० कोटीवरून डिसेंबर २५ पर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर २९८९० कोटीवरून ३३८७२ कोटीवर वाढ झाली आहे. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PAT) ६१३२ कोटीवरुन ६४६५ कोटींवर घसरण झाली आहे.
तिमाही बेसिसवर कंपनीच्या महसूलात सप्टेंबरपर्यंत तिमाही बेसिसवर (Quarter on Quater QoQ) ६% घसरण झाली असून इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ १३.३% आहे. तसेच अँडव्हान्स ए आय मधील महसूलात तिमाही बेसिसवर १९.९% वाढ झाली आहे. तर एआय महसूल १४६ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. तर सॉफ्टवेअर महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ३.१% वाढ झाली आहे. यावेळी निकालादरम्यान कंपनीने या आर्थिक वर्षात इयर ऑन इयर बेसिसवर ४ ते ४.५% महसूलात वाढ अपेक्षित असल्याचे कंपनीने म्हटले. तर यंदाच्या वर्षी ईबीआयटी (Earnings before interest tax) १७ ते १८% दरम्यान राहिल असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने निकाला दरम्यान १२ रूपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला असून सलग ९२ वा अंतरिम लाभांश पेआऊट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
निकालानंतर प्रतिकिया देताना कंपनीच्या संचालिका रोशनी नडार मल्होत्रा यांनी,'आम्ही आमच्या ग्राहकांना देत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मूल्यामुळे प्रेरित होऊन, आम्ही आणखी एका तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. आमच्या संपूर्ण व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता हे वाढीचे एक प्रमुख चालक घटक आहे आणि या उदयोन्मुख संधींचा फायदा घेण्यासाठी आम्ही आमच्या क्षमता अधिक विकसित करत आहोत.' असे म्हटले आहे. आज सत्राच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर १% पातळीवर उसळला आहे. दुपारी १२.१० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.१७% वाढ झाल्याने प्रति शेअर १६७०.५० रूपयांवर व्यवहार करत आहे.