वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वत:ला व्हेनेझुएलाचे कार्यकारी अध्यक्ष म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. व्हेनेझुएलामध्ये या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली आहे. यामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये तणावाचे वातावरण अधिक वाढले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली होती. यामुळे व्हेनेझुएलाच्या जनेतेत तीव्र आक्रोश निर्माण झाला होता. व्हेनेझुएलाची जनता ट्रम्प सरकारविरोधात रस्त्यावर उतरली होती. शिवाय याच वेळी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे ५० दशलक्ष बॅरल तेल ताब्यात घेतले असून त्याच्या विक्रीच्या कमाईवरही अमेरिकेचे नियंत्रण राहणार आहे. या सर्व घडामोंडीमुळे आधीच जागतिक स्तरावर गोंधळ सुरू असताना ट्रम्प यांच्या या नव्या धमक्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.