मतदानाला जाताना ओळखीच्या पुराव्यांपैंकी एक पुरावा बाळगा जवळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येईल. जर एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोग, यांनी १४ जुलै २०२५ च्या आदेशानुसार निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्‍त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली आहे.


मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ अंतर्गत गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करावे. परंतु ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल, अशी माहिती गगराणी यांनी दिली आहे.


लोकशाही प्रक्रियेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मतदान करताना प्रत्येक मतदाराने स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करावे. ज्यांच्याकडे सदर ओळखपत्र नसेल त्यांनी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर सादर करावा. यामुळे मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरळीत पार पडण्यास मदत होईल, असेही गगराणी यांनी नमूद केले.



मतदार ओळखपत्र नसल्यास ग्राह्य धरले जाणारे अन्य १२ प्रकारचे पुरावे



  1. भारताचे पारपत्र (पासपोर्ट)

  2. आधार ओळखपत्र

  3. वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

  4. आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र (पॅन कार्ड)

  5. केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्र (फोटो) सह दिलेली ओळखपत्रे

  6. राष्ट्रीयकृत बँका अथवा टपाल खात्‍यामधील खातेदाराचे छायाचित्र (फोटो) असलेले पासबूक

  7. सक्षम प्राधिकाऱयाने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला

  8. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)

  9. निवृत्त कर्मचाऱयांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबूक, प्रमाणपत्र इ.)

  10. लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र

  11. स्वातंत्र्य सैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र

  12. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड

Comments
Add Comment

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य