मोहित सोमण: भारत कोकिंग कोल या कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या आयपीओला आज अखेरच्या टप्प्यापर्यंत जबरदस्त सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तिसऱ्या अंतिम दिवशी आयपीओला एकूण १४१.९० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळे हा पब्लिक इशू यशस्वी झाला असून मोठा प्रतिसाद गुंतवणूकदारांना दिल्याचे यातून स्पष्ट होते. आकडेवारीनुसार पब्लिक इशूपैकी रिटेल गुंतवणूकदारांकडून एकूण ४७.५५ पटीने तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून तब्बल ३०६.१८ पटीने, व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २३९.४६ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या एकूण आयपीओतील सबस्क्रिप्शपैकी श्रेणीसह पाहिल्यास पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून उपलब्ध ७९१६९००० शेअरसाठी २४३१९४२२०० इतके सबस्क्रिप्शन मिळाले आहे तर रिटेल गुंतवणूकदारांकडून ५९३७६७५० शेअरसाठी १४२१८३३७४०० इतके सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून २३२८५००० शेअरसाठी ११६०३४६०० शेअरचे सबस्क्रिप्शन मिळाले आहे. आयपीओआधी कंपनीने २७३.१३ कोटीचा निधी अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केला होता. १०७१.११ कोटी रुपये मूल्यांकन असलेल्या आयपीओत ४६.५७ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (OFS) साठी ठेवण्यात आल्याने कुठलाही नवा फ्रेश इशू बाजारात नव्हता. ९ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत या आयपीओचे सबस्क्रिप्शन गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करण्यात आले होते.
१४ जानेवारी म्हणजेच उद्या पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात येणार आहे. कंपनीने आयपीओसाठी २३ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला होता तर हा शेअर बीएसई व एनएसईवर १६ जानेवारीला सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीचे सध्याचे बाजार १०७११.१० कोटी रुपये आहे. कंपनीचे शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ३३ रूपये प्रति शेअर सांगितली जात आहे. मूळ २३ रूपये प्राईज बँड किंमतीपेक्षा १० रूपये प्रति शेअर प्रिमियम दरावर हा शेअर सूचीबद्ध होईल असे आयपीओतील वर्तृळातून सांगितले जात आहे. भारत कोकिंग कोल ही कोळसा व तत्सम कोकिंग कोल निर्मिती करणारी कंपनी असून कोल इंडिया कंपनीची उपकंपनी (Subsidiary) आहे.
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कोकिंग कोळशाची मागणी ६७ दशलक्ष मेट्रिक टन (MT) राहण्याचा अंदाज आहे आणि आर्थिक वर्ष २०३५ पर्यंत ती १३८ दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, जी ७.५% वार्षिक चक्रवाढ वाढ दर्शवते. ही वाढ भारताची पोलाद उत्पादन क्षमता वार्षिक सुमारे ३०० दशलक्ष टनांपर्यंत विस्तारल्यामुळे होत आहे. भारताचे देशांतर्गत कोळसा उत्पादन एकूण मागणीपेक्षा कमी पडत आहे ज्यामुळे ही तफावत भरून काढण्यासाठी आयात करणे आवश्यक ठरते. हा देश जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा आयातदार आहे, जो जागतिक नॉन-कोकिंग कोळसा आयातीपैकी जवळपास १८ टक्के वाटा उचलतो. २०२५ मध्ये भारताने आपल्या ऊर्जा आणि औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे २४४ दशलक्ष टन कोळसा आयात केला.






