Tuesday, January 13, 2026

मराठमोळ्या बँक ऑफ महाराष्ट्राचा मजबूत तिमाही निकाल जाहीर! नफ्यात २६.५१% वाढ इतरही आकडेवारी मजबूत

मराठमोळ्या बँक ऑफ महाराष्ट्राचा मजबूत तिमाही निकाल जाहीर! नफ्यात २६.५१% वाढ इतरही आकडेवारी मजबूत

मोहित सोमण: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) बँकेने आपल्या तिमाही निकालाची घोषणा केली आहे. बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) निव्वळ नफ्यात २६.५१% वाढ प्राप्त झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये मिळालेल्या १४०६ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये १७७९ कोटींवर नफा प्राप्ती झाली. बँकेच्या एकूण उत्पन्नातही इयर ऑन इयर बेसिसवर १६.३७% अधिक वाढ मिळाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ७११२ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ८२७७ कोटींवर उत्पन्न मिळाले आहे. बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत १८.७८% वाढ मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या बँकेच्या एकूण व्यवसायात १७.२४% वाढ नोंदवली असताना आता बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरमध्ये २३०३ कोटी तुलनेत २७३६ कोटींवर वाढ नोंदवली.

दरम्यान बँकेच्या खर्चातही २६.५१% वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ५६ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये २२८ कोटींवर वाढ नोंदविण्यात आल्याचे बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले. माहितीनुसार यापूर्वी बँकेच्या ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर १५.९१% वाढ झाली होती. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २७९००७ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३२१६६१ कोटीवर वाढ बँकेने नोंदवली आहे. बँकेच्या निव्वळ महसूलात (Net Revenue) इयर ऑन इयर बेसिसवर १६.७३% वाढ मिळाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ३७३१ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३४२२ कोटींवर वाढ प्राप्त केली. आरओई (Returns on Equity RoE) तिसऱ्या तिमाहीतील (Q3FY26) इयर ऑन इयर बेसिसवर २३.७९% वाढ नोंदवली जी गेल्या वर्षी २२.३६% होती. आरओए (Return on Assetss RoA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १.८२% सुधारणा झाली आहे. ती गेल्या वर्षी १.७८% होती. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या रिटेल, शेती, व एमएसएमई कर्जात इयर बेसिसवर २०.२६% वाढ झाली होती.

बँकेच्या स्थूल एनपीएत (Gross Non Performing Assets NPA) इयर ऑन इयर बेसिसवर १.८०% घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १.७२% तुलनेत ही १.८०% पातळीवर पोहोचली आहे. तर निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NPA) इयर ऑन इयर बेसिसवर ०.२०% वरून ०.१८% घसरण झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत १ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश (Interim Dividend) १ रूपये दर्शनी मूल्याच्या (Face Value) शेअरवर भागभांडवल धारकांना मिळणार असल्याचे विधेयक पारित करण्यात आले.दुपारी ३.०४ वाजेपर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये १.५१% वाढ झाल्याने शेअर ६४.७३ रुपयांवर व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment