मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या निवडणुकांसाठी मतदानाच्या २४ तास आधी प्रचार थांबेल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या बारा जिल्हा परिषदा (Zilla Parishad) आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सोमवारी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची घोषणा केली आहे. उर्वरीत जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद निवडणूक १२ जिल्ह्यांमध्ये होणार
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणी
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मतं द्यावी लागतील. निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत त्या जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग एक जुलै २०२५ ची मतदार यादी वापरणार आहे. निवडणूक आयोगाने एक जुलै २०२५ ची मतदार यादी अंतिम स्वरुपात ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे.
राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र असतील. एकूण २.०९ कोटी मतदार मतदान करतील, त्यातील १.०२ कोटी महिला मतदार आहेत. एकूण बारा जिल्हा परिषदांसाठी ४३१ सदस्य निवडून द्यायचे आहेत.
जिल्हा परिषदांसोबतच १२५ पंचायत समित्यांसाठी १४६२ सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल. त्यातील ४३१ जागा महिलांसाठी, १६६ जागा अनुसुचित जातींसाठी आणि ३८ जागा अनुसुचित जमातींसाठी राखीव असतील. मागास प्रवर्गासाठी ३४२ जागा राखीव असतील.
मुंबई : राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी १२ जिल्हा ...
महाराष्ट्र : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : १६ ते २१ जानेवारी
अर्ज छाननी : २२ जानेवारी
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २७ जानेवारी, दुपारी ३ पर्यंत
अंतिम उमेदवार यादी, चिन्ह वाटप : २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर
मतदान : ५ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०
मतमोजणी, निकाल : ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० पासून
महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे.






