Monday, January 12, 2026

आजचे टॉप स्टॉक: 'या' ४ शेअर खरेदीसाठी मोतीलाल ओसवालकडून सल्ला

आजचे टॉप स्टॉक: 'या' ४ शेअर खरेदीसाठी मोतीलाल ओसवालकडून सल्ला

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांना सुचवले आहेत. आज टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या कुठले शेअर गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरतील जाणून घेऊयात.

१) Avenue Supermarts- अव्हेन्यू सुपरमार्ट (Dmart) कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३८०१ रूपये प्रति शेअर या सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह दिला असून २१% अपसाईड वाढीसह ४६०० रूपये लक्ष्य किंमत (Target Price TP) ब्रोकरेजने निश्चित केली आहे.

२) Infosys- इन्फोसिस कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १६१४ रूपये प्रति शेअर सीएमपीसह ३३% अपसाईड वाढीसह २१५० रुपये लक्ष्य किंमत ब्रोकरेजकडून निश्चित करण्यात आली आहे.

३) JSW Energy- जेएसडब्लू एनर्जी कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ४९० रुपये सीएमपीसह खरेदीचा सल्ला दिला आहे. तर शेअरसाठी ३४% अपसाईड वाढीसह ब्रोकरेजने ६५७ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

४) Lemon Tree Hotels- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १५० रूपये प्रति शेअर सीएमपीसह खरेदीचा सल्ला दिला आहे. तर ३३% अपसाईड वाढ ब्रोकरेजने २०० रूपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.

Comments
Add Comment