Monday, January 12, 2026

शेअर बाजाराचा टांगा पलटी घसरण फरार! शेवटी ८०० अंकाने बाजार रिकव्हर सेन्सेक्स ३०१.९३,निफ्टी १०६.९५ अंकाने रिबाऊंड'

शेअर बाजाराचा टांगा पलटी घसरण फरार! शेवटी ८०० अंकाने बाजार रिकव्हर सेन्सेक्स ३०१.९३,निफ्टी १०६.९५ अंकाने रिबाऊंड'

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३०१.९३ अंकांने उसळत ८३८७८.१७ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १०६.९५ अंकाने उसळत २५७९०.२५ पातळीवर स्थिरावला आहे. मोठ्या प्रमाणात इंट्राडे सेन्सेक्स व निफ्टी 'रिबाऊंड' झाल्याने सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात सुधारणा झाली. घसरत्या शेअर बाजारात ८०० अंकाने सेन्सेक्सने रिकक्वरी दर्शविल्याने शेअर बाजार ग्रीन सिग्नल मध्ये बंद झाला. आज सेन्सेक्सने सत्रात सर्वाधिक वाढ ८३९४५.७३ अंकावर नोंदवली असून सर्वाधिक घसरण ८२८६१.०७ पातळीवर नोंदवला आहे. दरम्यान बँक निफ्टीनेही वापसी केल्याने बाजारात मूलभूत सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप १००, मिडकॅप ५०, स्मॉलकॅप १०० निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. तेल, गॅस, फायनांशियल सर्विसेस, एफएमसीजी, मेटल, पीएसयु बँक, प्रायव्हेट बँक या निर्देशांकात अखेरीस वाढलेल्या खरेदी व्हॉल्यूममध्ये झालेल्या वाढीचा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले. तर घसरण मिडिया, आयटी, रियल्टी, हेल्थकेअर, मिड स्मॉल आयटी टेलिकॉम निर्देशांकात झाली आहे. आज अस्थिरतेचा जागर असतानाच मात्र एका अहवालातील माहितीत युएस व भारत यांच्यातील द्विपक्षीय करारास पुन्हा वेग आल्याने चर्चा सकारात्मक स्थितीत जात असल्याचे म्हटले होते.ज्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपले सेल ऑफ रोखत खरेदीत वाढ केली. परिणामी शेअर बाजार रिबाऊंड झाले.

आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सुरुवातीला सत्रात इराण व युएस यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सावध पवित्रा घेतला होता. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली होती तर सोने चांदी व इतर कमोडिटीतही मोठी वाढ झाली आहे. दरम्यान दिग्गज एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स,बजाज ऑटो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली होती तर रिलायन्स इंडस्ट्रीज,टाटा स्टील, कोल इंडिया, वेदांता, जेएसडब्लू स्टील, नेस्ले इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजार तेजीत बंद होण्यास कारणीभूत ठरला आहे. निश्चितच निर्देशांकात वरकरणी तेजी दिसत असली तरी अस्थिरतेचा अंडकरंट कायम राहिला आहे. अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX ) ३.६३% उसळला होता. बीएसईवर ४४७७ शेअरपैकी १५६४ शेअर्समध्ये वाढ झाली असून २७०७ शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे. एनएसईत ३२३७ शेअरपैकी १२३१ शेअर्समध्ये वाढ झाली असून १९०६ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बीएसईत एकूण १८० शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले असून २६६ शेअर लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. तर एनएसईत ४८ शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले असून ४५९ शेअर लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. आज महत्वपूर्ण आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांचा बाजारातील उत्साहात वाढ झाली आहे. रूपयातही किरकोळ घसरण झाल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रोख विक्रीत काय भूमिका घेतील ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयएफसीआय (१५.१४%), फोर्स मोटर्स (३.३६%), हिंदुस्थान कॉपर (४.४८%), बीएसई (४.५४%),प्रिमियर एनर्जीज (३.९७%), हिंदुस्थान झिंक (३.५९%), होम फर्स्ट फायनान्स (३.५२%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण तेजस नेटवर्क (९.४८%), सिटी युनियन बँक (३.४८%), जीई व्हर्नोवा (६.२१%), सिग्नेचर ग्लोबल (५.१६%), अपार इंडस्ट्रीज (५.१७%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'पुढील वाटाघाटींच्या फेरीपूर्वी अमेरिकेच्या राजदूतांनी व्यापार कराराबाबत केलेल्या अनुकूल विधानांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याने भारतीय बाजारपेठ दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरली. या सकारात्मक वातावरणाचा एकूण बाजाराच्या भावनांना चालना मिळाली.कमोडिटी क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली, ज्याला धातूंमधील तेजीचा आधार मिळाला, कारण पुरवठ्याच्या मर्यादा असतानाही नव्याने खरेदीची आवड निर्माण झाल्याने त्यांना फायदा झाला. ग्राहक आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही मूल्याधारित खरेदी दिसून आली, कारण गुंतवणूकदार अलीकडील घसरणीनंतर संधी शोधत होते, ज्याला तिसऱ्या तिमाहीतील मजबूत कमाईच्या अपेक्षा आणि सुधारत्या मागणीचा पाठिंबा होता. याव्यतिरिक्त, सततच्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंनी आपली तेजी कायम ठेवली आहे.'

Comments
Add Comment