Monday, January 12, 2026

मकरसंक्रांती २०२६, १४ की १५ जानेवारी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

मकरसंक्रांती २०२६, १४ की १५ जानेवारी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मात मकरसंक्रांतीला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि सूर्योपासना केल्यास मोठे पुण्य लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीच्या स्वामित्वातील मकर राशीत प्रवेश करतात. म्हणजेच सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करतात आणि याच दिवसापासून सूर्य उत्तरायणाला प्रारंभ करतो.

मकरसंक्रांती २०२६ कधी आहे?

२०२६ साली मकरसंक्रांतीचा सण १४ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे १४ की १५ जानेवारी या संभ्रमाला पूर्णविराम मिळतो.

भारताच्या विविध भागांत मकरसंक्रांती वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते.

बिहार आणि उत्तर प्रदेशात — मकरसंक्रांती / खिचडी पर्व पंजाब आणि हरियाणामध्ये — लोहडी तामिळनाडूमध्ये — पोंगल आसाममध्ये — माघ बिहू किंवा भोगली बिहू

मकरसंक्रांती २०२६ : पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ

पुण्यकाळ दुपारी १५:१३ ते सायंकाळी १७:४५ कालावधी : २ तास ३२ मिनिटे

महापुण्यकाळ दुपारी १५:१३ ते १६:५८ कालावधी : १ तास ४५ मिनिटे

दान–पुण्याचे धार्मिक महत्त्व

मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू, गजक आणि रेवडी वाटण्याची परंपरा आहे. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशातून सामाजिक ऐक्य जपला जातो. या दिवशी अन्नधान्य, तूप, तिळ, तांदूळ, डाळी, भाजीपाला, मीठ, खिचडी, वस्त्र आणि कम्बल दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते. यामुळे जीवनात सुख, समृद्धी, समाधान टिकून राहते. तसेच या दिवशी श्रद्धेने सूर्यदेवाची उपासना केल्यास मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होते, असे मानले जाते.

Comments
Add Comment