मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. जागतिक अस्थिरतेचा फटका आजही कायम राहिला असून सेन्सेक्स ४१४.५० व निफ्टी १२०.८० अंकाने कोसळला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही घसरण झाली असून एफएमसीजी, मेटल शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर इतर निर्देशांकात घसरण सुरुच आहे. सकाळी फार्मा, हेल्थकेअर, मिडिया, आयटी निर्देशांकात मोठी घसरण झाल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळू शकली नाही किंबहुना अधिक घसरली. हेवीवेट शेअर्समध्येही आज नफा बुकिंग सुरू असल्याने बाजारात घसरण राहिले असेच दिसते.
विशेषतः युएसकडून आत इराणवरील हल्ल्याची तयारी सुरु झाली असताना बाजारातील अस्वस्थता आणखी वाढली. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही मोठी वाढ झाली असून सोने चांदी कमोडिटीत तुफान वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयएफसीआय (३.७५%), मन्नपूरम फायनान्स (२.८९%), प्रिमियर एनर्जीज (२.६६%), अव्हेन्यू सुपरमार्ट (२.३९%), वारी एनर्जीज (२.३८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण तेजस नेटवर्क (६.९९%), सिग्नेचर ग्लोबल (६.४१%), महाराष्ट्र स्कूटर (५.३८%), हिताची एनर्जी (४.७८%), भेल (४.७४%), टीबीओ टेक (३.४५%) समभागात झाली आहे.






